S M L

भाजपनं जैश-ए-मोहम्मदला जन्म दिला -कपिल सिब्बल

Sachin Salve | Updated On: Oct 7, 2016 11:04 PM IST

 भाजपनं जैश-ए-मोहम्मदला जन्म दिला -कपिल सिब्बल

07 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीद जवानांच्या रक्ताची दलाली करतात, असं वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं. आता काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी तर भाजपचा संबंध जैश ए मोहम्मदशी जोडून सर्जिकल स्ट्राईकचं राजकारण आणखी खालच्या थराला नेलंय.

उरीतल्या अतिरेकी हल्ल्यानंतर बहाद्दर भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन अतिरेक्यांचे 7 अड्डे उद्‌ध्वस्त केले.देशाच्या अस्मितेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या घटनेचं राजकारण होईल अशी अपेक्षा नव्हती.पण इतर प्रसंगासारखंच राजकारण्यांनी भान सोडलं. जवानांचं बलिदान विसरून शहिदांच्या रक्ताचे शिंतोडे

उडवण्यापर्यंत या राजकारणानं खालची पातळी गाठली..

सर्जिकल स्ट्राईकनंतरच्या या आरोप प्रत्यारोपात उडी घेत कपील सिब्बल यांनी आणखी एक सनसनाटी आरोप करत खळबळ उडवून दिली. जैश ए मोहम्मदचा संबंध त्यांनी थेट भाजपशी जोडून टाकला..

देशात दहशतवादी कारवाया वाढत असताना आणि सीमेवर सैनिक जीवाची बाजी लावत असताना राजकीय नेत्यांनी संयमानं परिस्थिती हातळायला हवी, ही अपेक्षा..पण केवळ कोणत्याही गोष्टीचं राजकारण करून वादंग माजवणाऱ्या या राजकारण्यांनी देशवासीयांची पुन्हा एकदा निराशा केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2016 11:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close