S M L

डंपिंग ग्राउंडचा वाद विधिमंडळात

अमेय तिरोडकर, मुंबई22 एप्रिलमुंबईतील डंपिंग ग्राउंडचा वाद आता विधिमंडळात पोहोचला आहे. 8 हजार 895 कोटींचे टेंडर देताना शिवसेनेने घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी केला. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी टेंडर्सची चौकशी करू, असे आश्वासन दिले आहे.पण मुंबईच्या कचर्‍यावरुन भविष्यात मोठे राजकारण होईल, याचे स्पष्ट संकेतच आता मिळाले आहेत.मुंबई महापालिकेने डंपिंग ग्राऊंडसंदर्भात 2 टेंडर्स मंजूर केलीत. त्यात कांजूरमार्ग येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंडसाठी 4 हजार 487 करोड रुपयांचे पहिले टेंडर तर, देवनार येथील डंपिंग ग्राऊंड शास्त्रीय पद्धतीने बंद करण्यासाठी 4 हजार 408 कोटी रुपयांचे दुसरे. एकूण 8 हजार 895 कोटी रुपयांची ही टेंडर्स आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीने 2006 मध्ये याच कामांसाठीचे टेंडर नाकारले होते. पण 2009 मध्ये त्याची दोन टेंडर्स झाल्यानंतर ती स्विकारली गेली. त्यामुळेच या टेंडरची चौकशी व्हावी, अशी मागणी कांॅंग्रेसचे आमदार बाबा सिद्दिकी यांनी केली आहे.पण स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष रवींद्र वायकर यांनी सिद्दीकींना उत्तर दिले.या प्रकरणाची मुख्यमंत्र्यानी चौकशी लावली आहे. त्यामुळे मनसे यातूनच काँग्रेसच्या सोबत आली आहे.असे म्हणतात की, आजकाल टेंडरभोवती, टेंडरसाठी राजकारण चालते. कचर्‍यासाठी एवढी प्रचंड रक्कम मोजणारी मुंबई ही देशातील एकमेव महापालिका असेल. त्यामुळेच टेंडरचे राजकारण निवडणुकीत रंग भरेल हे नक्की.मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली चौकशी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर संपेल. आणि या टेंडर नाट्याचा दुसरा अंक सुरू होईल, अशी चर्चा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 22, 2010 03:02 PM IST

डंपिंग ग्राउंडचा वाद विधिमंडळात

अमेय तिरोडकर, मुंबई

22 एप्रिल

मुंबईतील डंपिंग ग्राउंडचा वाद आता विधिमंडळात पोहोचला आहे. 8 हजार 895 कोटींचे टेंडर देताना शिवसेनेने घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी केला.

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी टेंडर्सची चौकशी करू, असे आश्वासन दिले आहे.

पण मुंबईच्या कचर्‍यावरुन भविष्यात मोठे राजकारण होईल, याचे स्पष्ट संकेतच आता मिळाले आहेत.

मुंबई महापालिकेने डंपिंग ग्राऊंडसंदर्भात 2 टेंडर्स मंजूर केलीत. त्यात कांजूरमार्ग येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंडसाठी 4 हजार 487 करोड रुपयांचे पहिले टेंडर तर, देवनार येथील डंपिंग ग्राऊंड शास्त्रीय पद्धतीने बंद करण्यासाठी 4 हजार 408 कोटी रुपयांचे दुसरे.

एकूण 8 हजार 895 कोटी रुपयांची ही टेंडर्स आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीने 2006 मध्ये याच कामांसाठीचे टेंडर नाकारले होते. पण 2009 मध्ये त्याची दोन टेंडर्स झाल्यानंतर ती स्विकारली गेली. त्यामुळेच या टेंडरची चौकशी व्हावी, अशी मागणी कांॅंग्रेसचे आमदार बाबा सिद्दिकी यांनी केली आहे.

पण स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष रवींद्र वायकर यांनी सिद्दीकींना उत्तर दिले.

या प्रकरणाची मुख्यमंत्र्यानी चौकशी लावली आहे. त्यामुळे मनसे यातूनच काँग्रेसच्या सोबत आली आहे.

असे म्हणतात की, आजकाल टेंडरभोवती, टेंडरसाठी राजकारण चालते. कचर्‍यासाठी एवढी प्रचंड रक्कम मोजणारी मुंबई ही देशातील एकमेव महापालिका असेल. त्यामुळेच टेंडरचे राजकारण निवडणुकीत रंग भरेल हे नक्की.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली चौकशी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर संपेल. आणि या टेंडर नाट्याचा दुसरा अंक सुरू होईल, अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2010 03:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close