S M L

पावसाचे पाणी वाचवा

मंगेश कराळे, वसई22 एप्रिलआज पावसाच्या अनियमिततेमुळे पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यावर उपाय म्हणून भारतातील नगर पालिका क्षेत्रातील पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग इनफॉर्मेमेशन सेंटर 14 एप्रिल 2008 ला नवघर-माणिकपूरमध्ये उघडण्यात आले. या सेंटरच्या माध्यामातून पाणी वाचवण्याचा संदेश देण्यात येत आहे. वसईतील 30 टक्के बिल्डिंगमध्ये कॅचमेंट बनवले गेले आहेत. पण निधीअभावी काही सहकारी सोसायट्यांनी या उपक्रमाकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारने या उपक्रमासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पुढे येत आहे. रेन वॉटर हार्वेस्टींगचा कायदा तामिळनाडूमध्ये आहे. आज ठाणे आणि मुंबई महापालिकेनेही रेन वॉटर हार्वेस्टींग सुरू केले आहे. त्यामुळे नव्याने होऊ घातलेल्या वसई महापालिकेला हा रेन वॉटर हार्वेस्टींग उपक्रमअपयुक्त ठरेल यात शंका नाही

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 22, 2010 03:18 PM IST

पावसाचे पाणी वाचवा

मंगेश कराळे, वसई

22 एप्रिल

आज पावसाच्या अनियमिततेमुळे पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.

यावर उपाय म्हणून भारतातील नगर पालिका क्षेत्रातील पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग इनफॉर्मेमेशन सेंटर 14 एप्रिल 2008 ला नवघर-माणिकपूरमध्ये उघडण्यात आले. या सेंटरच्या माध्यामातून पाणी वाचवण्याचा संदेश देण्यात येत आहे.

वसईतील 30 टक्के बिल्डिंगमध्ये कॅचमेंट बनवले गेले आहेत. पण निधीअभावी काही सहकारी सोसायट्यांनी या उपक्रमाकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारने या उपक्रमासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पुढे येत आहे.

रेन वॉटर हार्वेस्टींगचा कायदा तामिळनाडूमध्ये आहे. आज ठाणे आणि मुंबई महापालिकेनेही रेन वॉटर हार्वेस्टींग सुरू केले आहे.

त्यामुळे नव्याने होऊ घातलेल्या वसई महापालिकेला हा रेन वॉटर हार्वेस्टींग उपक्रमअपयुक्त ठरेल यात शंका नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2010 03:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close