S M L

सर्जिकल स्ट्राईकला अमेरिकेचा पाठिंबा

Sachin Salve | Updated On: Oct 13, 2016 06:53 PM IST

13 ऑक्टोबर : भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला अमेरिकेने पाठिंबा दिलाय. भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे, असं अमेरिकेने म्हटलंय. पण भारत आणि पाकिस्तानमध्ये जो तणाव निर्माण झालाय त्याबद्दल अमेरिकेने चिंताही व्यक्त केलीय. सीमेवर मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात करण्यात आलंय. त्यामुळे दोन्ही शेजारी देशांनी खबरदारी घ्यायला हवी, असा इशारा अमेरिकेने दिलाय.

modi-obama_1_0_0_0_0_0_0_0उरीच्या लष्करी तळावर झालेला हल्ला दहशतवादी हल्ला आहे आणि आम्ही याचा जोरदार निषेध करतो, असंही अमेरिकेने म्हटलंय. दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी भारताने लष्कर तैनात केलंय. पण भारत आणि पाकिस्तानला 3 युद्धांचा इतिहास आहे. त्यामुळे हे संबंध अधिक ताणू नये, असं अमेरिकेचं म्हणणं आहे.

काश्मीर प्रश्न सोडवल्याशिवाय अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होणार नाही, असा पाकिस्तानचा दावा आहे. पण अमेरिकेने हा दावा फेटाळलाय. अणुपुरवठादार देशांच्या गटात भारताला स्थान मिळावं यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करतेय, असंही अमेरिकेने म्हटलंय. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते पीटर लेव्ही यांनी अमेरिकेची ही भूमिका जाहीरपणे मांडलीय.

पीटर लेव्ही यांनी गेल्याच आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. यात पाकिस्तानत्या प्रतिनिधींनी काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याची भूमिका मांडली. पण आम्ही पाकिस्तानच्या प्रस्तावाशी सहमत नाही, असं पीटर लेव्ही यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2016 06:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close