S M L

एकतर्फी प्रेमातून जाळल्या गाड्या

26 एप्रिलनाशिकमधील गाड्या जळीत प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करणार्‍या मुलांनीच या गाड्या जाळल्याचे उघड झाले आहे. प्रेम प्रकरणाची माहिती संबंधित मुलीच्या घरच्यांना सोसायटीच्या रहिवाशांनी दिली. त्याचा राग मनात धरून या मुलांनी अवनी बिल्डींगच्या पाकीर्ंगमधील गाड्या जाळल्या. पवन मटाले, धनराज डोंगरे, नितीन परदेशी आणि राकेश चौधरी या 18 ते 20 वर्षे वयोगटातल्या तरुणांना पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. या इमारतीतील एका अल्पवयीन मुलीसोबत पवन मटालेचे प्रेमसंबंध होते. त्याची माहिती तेथील रहिवाशांनी मुलीच्या पालकांना दिल्याचा राग मनात धरून त्याने या गाड्या जाळल्याची कबुलीही पोलिसांकडे दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 26, 2010 09:09 AM IST

एकतर्फी प्रेमातून जाळल्या गाड्या

26 एप्रिल

नाशिकमधील गाड्या जळीत प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करणार्‍या मुलांनीच या गाड्या जाळल्याचे उघड झाले आहे.

प्रेम प्रकरणाची माहिती संबंधित मुलीच्या घरच्यांना सोसायटीच्या रहिवाशांनी दिली. त्याचा राग मनात धरून या मुलांनी अवनी बिल्डींगच्या पाकीर्ंगमधील गाड्या जाळल्या.

पवन मटाले, धनराज डोंगरे, नितीन परदेशी आणि राकेश चौधरी या 18 ते 20 वर्षे वयोगटातल्या तरुणांना पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. या इमारतीतील एका अल्पवयीन मुलीसोबत पवन मटालेचे प्रेमसंबंध होते.

त्याची माहिती तेथील रहिवाशांनी मुलीच्या पालकांना दिल्याचा राग मनात धरून त्याने या गाड्या जाळल्याची कबुलीही पोलिसांकडे दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2010 09:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close