S M L

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, एक जवान शहीद

Samruddha Bhambure | Updated On: Oct 17, 2016 12:43 PM IST

ceasefire

17 ऑक्टोबर:  जम्मू-काश्मीरच्या राजौरी इथे पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं आहे. या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे.

पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात सुधीश कुमार शहीद झाले आहेत. गेल्या 24 तासात दोनवेळा नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे.

जम्मू इथल्या राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांकडून काल (रविवारी) गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या प्रत्युत्तरादरम्यान, पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात 6 राजपूत रेजीमेंटचे सुधीर कुमार हे शहीद झाले.

भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया अद्यापही सुरूच आहेत. त्यामुळे पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2016 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close