S M L

भुवनेश्वरमधील रुग्णालयाला आग, 22 जणांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2016 11:48 PM IST

भुवनेश्वरमधील रुग्णालयाला आग, 22 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : ओडिसाची राजधानी भुवनेश्वरमधील एसआयूएस हॉस्पिटलमध्ये संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत 22 जणांचा मृत्यू झालाय तर 30 जण जखमी आहे. आग विझवण्याचे काम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

भुवनेश्वरमधील एसआयूएस हॉस्पिटलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय. आग लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ उडाला. आयसीयूमध्ये आग लागल्यामुळे रुग्णांना बाहेर काढण्यात अपयश आलं. त्यात अनेक रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बाहेर काढण्याचं बचावकार्य सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2016 11:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close