S M L

सपात यादवी, अखिलेश यादवांचा बंडाचा इशारा

Sachin Salve | Updated On: Oct 19, 2016 11:51 PM IST

सपात यादवी, अखिलेश यादवांचा बंडाचा इशारा

19 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीआधी समाजवादी पक्षातली यादवी शिगेला पोहोचलीय. अखिलेश आणि शिवपाल यादव या काकापुतण्यांचा संघर्ष शमवण्याचा प्रयत्न मुलायमसिंह यादव करतायत पण अखिलेश यादव हार मानायला तयार नाहीत. अखिलेश यादव यांना पक्षावर पूर्णपणे त्यांचंच नियंत्रण हवं आहे. आता अखिलेश यादव यांनी मुलायमसिंह यादव यांना एक अटीशर्तींचं पत्रच लिहिलंय. या पत्रात अखिलेश यांनी 3 अटी घातल्यायत.

अखिलेश यांच्या अटी

- मला राज्यात पक्षप्रमुख बनवा

- तिकीटवाटपामध्ये माझं मत महत्त्वाचं

- शिवपाल यादव यांनी निलंबित केलेल्या माझ्या सहका•ऱ्यांना पक्षात परत घ्या

अखिलेश यादव यांनी पक्षाच्या लेटरहेडवर अधिकृतपणे हे पत्र लिहिलंय. त्यासोबतच 3 नोव्हेंबरपासून आपण निवडणूक यात्रा सुरू करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी पत्रात दिलीय. 5 नोव्हेंबरला समाजवादी पक्षाचा रजत महोत्सव साजरा करण्यात येतोय. अखिलेश यादव मात्र या कार्यक्रमाला हजर राहणार नाहीयेत.

आपला मुलगा आणि भाऊ यांच्यातला हा संघर्ष हाताळणं मुलायमसिंह यादव यांच्यासाठी आव्हान बनलंय. शिवपाल यादव यांना पक्षात तगडं समर्थन असल्यामुळे त्यांच्यापुढे मुलायमना माघार घ्यावी लागलीय. अखिलेश यादव यांनी शिवपाल यांच्याकडून काढून घेतलेली खाती त्यांना परत देण्यात आली. त्यांना पक्षाचं प्रमुखही बनवावं लागलं. आणि काका- पुतण्यांच्या संघर्षात काकांच्याच बाजूने दान पडलं.

समाजवादी पक्षावर नेमकं नियंत्रण कुणाचं हा प्रश्न तर आहेच पण उत्तर प्रदेशात 'कौन बनेगा मुख्यमंत्री' हे नाट्यही रंगलंय. अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यातली ही रस्सीखेच उत्तर प्रदेशला कोणत्या पथावर नेते ते बघायचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2016 11:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close