S M L

विदर्भातील भातशेती संकटात

17 ऑक्टोबर, दिल्लीविदर्भात यंदा कमी पावसामुळे भाताच्या पिकांवर संकट आलं आहे. भंडारा, गोंदिया तसंच नागपूर जिल्ह्यात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली होती. मात्र पावसाअभावी त्यांचा पैसा वाया गेला आहे. आता प्रशासनाकडूनही या शेतक-यांना समाधानकारक उत्तरं मिळत नाही. भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडीत दिनेश देशमुख त्यांच्या आठ एकर जमिनीत गेल्या अनेक वर्षांपासून भात शेती करत आहेत. गेल्यावर्षी चांगलं पिक आल्ंा म्हणून त्यांनी यंदा पन्नास हजार रुपये कर्ज काढून भाताचं पीक लावलं, पण पाणीच कमी असल्यानं पीक खराब झालं. देशमुखांसारखी अनेक शेतकर्‍यांची अशीच परिस्थिती आहे. चंद्रपूर, भंडारा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाताचं पीक घेण्यात येतं. नागपूर विभागात 7 लाख हेक्टर जमिनीवरील तांदूळ क्षेत्रापैकी 60 टक्के जमिनीवरचं तांदूळ खराब झाला आहे. प्रशासनानंही या खराब पिकाची पाहणी केली आहे. पण सरकारकडेही आश्वासनाशिवाय शेतक-यांसाठी दुसरं उत्तर नाही. ' भाताच्या पीकाबाबतीतला निर्णय अधिवेशनात घेतला जाईल. शेतक-यांना काय मदत देण्याचा निर्णय त्यावेळी होईल', असं महसूलमंत्री नारायण राणे यांनी नागपूर दौर्‍यादरम्यान सांगितलं. दरवेळी सरकार फक्त मदतीचं आश्वासन देतं. पण शेतक-यांना ऐन वेळी जर मदत मिळणार नसेल तर आश्वासनांचा काय उपयोग ?

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2008 01:30 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2008 01:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close