S M L

पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर

Samruddha Bhambure | Updated On: Oct 26, 2016 11:45 AM IST

pakistan ceasefire voilation

26 ऑक्टोबर : पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं जात आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं जात असताना बीएसएफही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत असून यामध्ये पाच ते सहा पाकिस्तानी रेंजर्स उद्ध्वस्त केले आहेत. तसंच भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात तीन पाकिस्तानी जवानांचा खात्मा केला.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारामुळे सीमारेषेवरील राहणारे लोक घर सोडून चालले आहेत. जम्मूजवळील आरएसपुरा आणि अरनिया सेक्टरमधील बीएसएफ पोस्टवर रात्रभर पाकिस्तानकडून गोळीबार सुरु होता.

या गोळीबारादरम्यान, 11 जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय लष्कराकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत राजोरी येथील नौशेरा येथे तीन पाकिस्तानी जवानांचा खात्मा करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2016 11:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close