S M L

गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Oct 28, 2016 05:14 PM IST

गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचं निधन

 28 ऑक्टोबर : गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचं निधन झालंय. त्या 81 वर्षांच्या होत्या. महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या त्या महत्त्वाच्या नेत्या होत्या. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या त्या कन्या होत्या.

1973 मध्ये दयानंद बांदोडकर यांचं निधन झाल्यानंतर शशिकला काकोडकर गोव्याच्या मुख्यमंत्री झाल्या. एप्रिल 1979 पर्यंत त्यांनी गोव्याचा मुख्यमंत्रिपदी काम केलं. त्यांनी गोव्याच्या शिक्षणमंत्रिपदीही महत्त्वाची कामगिरी बजावली. प्राथमिक शिक्षणामध्ये इंग्रजीचा वापर कमी करून मराठी भाषा आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. यावरून गोव्याच्या राजकारणात बरीच खळबळ माजली होती. शशिकला काकोडकर या भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या अध्यक्ष होत्या. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं अनुदान बंद करावं यासाठी त्यांनी गोव्यात मोठी चळवळ सुरू केली होती.

शशिकला काकोडकरांची कारकिर्द

- शशिकला काकोडकर गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

- शशिकला या गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या कन्या

- बांदोडकरांच्या मृत्यूनंतर 1973 साली गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

- एप्रिल 1979 पर्यंत शशिकला काकोडकर या गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी राहिल्या

- मराठी भाषेला प्रादेशिक भाषेचा दर्जा देण्यासाठी पुढाकार घेतला

- भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2016 05:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close