S M L

पाकिस्तानी अतिरेक्यांनी शहीद जवानाच्या मृतदेहाची केली विटंबना

Sachin Salve | Updated On: Oct 28, 2016 11:12 PM IST

पाकिस्तानी अतिरेक्यांनी शहीद जवानाच्या मृतदेहाची केली विटंबना

28 ऑक्टोबर : काश्मीरमधल्या कुपवाडामध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झाला. संतापजनक बाब म्हणजे दहशतवाद्यांनी या शहीद जवानाच्या मृतदेहाची विटंबना केलीय. या दहशतवाद्यांना संरक्षण देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने गोळीबारही केला.

पाकिस्तानी लष्कराच्या या कृत्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध पुन्हा ताणले गेलेत. या जवानाचा मृतदेह पाकव्याप्त काश्मीरमध्ये नेण्याच्या आधी त्याच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने ही बाब प्रसारमाध्यमांसमोर आणलीय. पाकिस्तानच्या या कृत्याला आम्ही प्रत्युत्तर देऊ, असंही लष्कराच्या प्रवक्त्याने म्हटलंय.

काश्मीरमध्ये कुपवाडाच्या मछिल क्षेत्रात दहशतवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. नियंत्रण रेषेवर झालेल्या या धुमश्चक्रीत एक जवान शहीद झाला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं.

काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेचं उल्लंघन केल्याबद्दल 15 पाकिस्तानी जवानांना सीमा सुरक्षा दलाने ठार केल्याची घटना कालच घडलीय. यानंतर लगेचच दहशतवाद्यांनी हा हल्ला चढवला.याआधी गेल्याच आठवड्यात नियंत्रण रेषेचं उल्लंघन करणा•या 7 पाकिस्तानी जवानांना ठार करण्यात आलं.

पाकिस्तानने मात्र या घटनांचा इन्कार केलाय. राजौरी, सांबा या क्षेत्रात पाकिस्तानी लष्कराकडून नियंत्रण रेषेचं उल्लंघन होण्याच्या घटना वारंवार घडल्यायत, असं लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2016 11:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close