S M L

नॅनो होणार 'मेड इन पुणे'

17 ऑक्टोबर, मुंबईनॅनो गाडी पुणे आणि पंतनगर प्लांन्टमध्ये तयार होणार असल्याची अधिकृत माहिती टाटा मोटर्सनं दिली आहे. नॅनोचं इंजिन पुण्यातल्या कारखान्यात बनेल तर पंतनगरमध्ये नॅनोचं असेम्बलिंग होईल. या वर्षाअखेरपर्यंत कंपनी 300 गाड्या बनवणार आहे. पण नॅनोची मोठ्या प्रमाणावर निर्मिती पुढील वर्षापासूनच सुरू होईल. त्यासाठी गुजरातमधल्या साणंदची जागा तर ठरलेली आहे तसंच देशातली सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआय आता नॅनोसाठी बुकिंगची सुविधा देणार आहे तसंच या कारसाठी विशेषरित्या कर्जदेखील एसबीआयमध्ये उपलब्ध होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2008 04:29 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2008 04:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close