S M L

पंतप्रधानांची गिलानींकडे नाराजी

29 एप्रिलपंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यात भूतानमध्ये चर्चा झाली. भूतानमधल्या थिंपूत सार्क परिषदेच्या निमित्तानं दोन्ही नेत्यांनी 50 मिनिटे बातचीत केली. चर्चा सकारात्मक झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या निरुपमा राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुढच्या काळात दोन्ही देशांत चर्चा प्रक्रिया सुरू ठेवण्याबाबत यावेळी बातचीत झाली. दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि परराष्ट्र सचिव लवकरच भेटणार आहेत. 26/11 च्या खटल्यातील असमाधानकारक प्रगती आणि हाफीज सईदवर कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दल मनमोहन सिंग यांनी गिलानी यांच्याजवळ नाराजी व्यक्त केली.दहशतवादामुळे दोन्ही देशांच्या चर्चा प्रक्रियेत अडथळे येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारतविरोधी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान अतिरेक्यांना आपल्या जमिनीचा वापर करू देणार नाही, अशी हमी गिलानी यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2010 02:20 PM IST

पंतप्रधानांची गिलानींकडे नाराजी

29 एप्रिल

पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यात भूतानमध्ये चर्चा झाली. भूतानमधल्या थिंपूत सार्क परिषदेच्या निमित्तानं दोन्ही नेत्यांनी 50 मिनिटे बातचीत केली. चर्चा सकारात्मक झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या निरुपमा राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुढच्या काळात दोन्ही देशांत चर्चा प्रक्रिया सुरू ठेवण्याबाबत यावेळी बातचीत झाली. दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि परराष्ट्र सचिव लवकरच भेटणार आहेत. 26/11 च्या खटल्यातील असमाधानकारक प्रगती आणि हाफीज सईदवर कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दल मनमोहन सिंग यांनी गिलानी यांच्याजवळ नाराजी व्यक्त केली.

दहशतवादामुळे दोन्ही देशांच्या चर्चा प्रक्रियेत अडथळे येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारतविरोधी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान अतिरेक्यांना आपल्या जमिनीचा वापर करू देणार नाही, अशी हमी गिलानी यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2010 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close