S M L

अमेरिकेतील हजारो भारतीय नोकरीच्या शोधात

17 ऑक्टोबर, मुंबईअमेरिकेत मंदीच्या संकटानं तिथल्या अनेक कंपन्यांनी कर्मचारी संख्या कमी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अमेरिकेतून भारतातील कंपन्याकडे नोकरीसाठी अर्ज करणार्‍यांची संख्या वाढली आहे. पण जाणकारांच्या मते इतक्या सार्‍या जणांना भारतीय जॉब मार्केटमध्ये नोकरी मिळणं सहज सोपं नाही. भारतीय जॉब पोर्टल्सकडे हल्ली अमेरिका आणि युरोपमधून शेकडो येत आहेत. अमेरिकेतल्या मंदीमुळे तिथल्या अनेक भारतीयांच्या नोकर्‍या गेल्यात आणि हताश झालेल्या या भारतीय तरुणांनी पुन्हा मायदेशाकडे मोर्चा वळवला आहे. ह्युमन रिसोर्सेसमधल्या काही तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे मागील सहा महिन्यात तिकडून नोकर्‍यांसाठी अर्ज येण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे भारतात परत येऊ इच्छिणार्‍या फायनान्शिअल सेक्टरमधल्या 125 प्रोफेशनल्सची एमा पार्टनर्स या कंपनीनं एक लिस्ट बनवली आहे. यातले बहुतेक लोक लेहमन, मॉर्गन अड स्टॅनले आणि मेरिल लिंचमधले आहेत. पण प्रोफेशनल्स असोत वा फ्रेशर्स भारतीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळणं सोपं नसल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. __PAGEBREAK__ नोकर्‍यांची चणचण फक्त फायनान्शिअल सेक्टरमध्येच नाही तर ऑटो आणि एव्हिएशन सेक्टरमध्येही अशीच परिस्थिती आहे. पण भारतात परतणार्‍या फक्त दहा ते पंधरा टक्के लोकांनाच इथं नोकरी मिळू शकेल आणि त्याही मध्यम दर्जाच्या कंपन्या असतील. भारतात नोकरीसाठी परत येणार्‍या या एनआरआयजमुळे भारतातल्या फ्रेशर्सच्या नोकरीच्या संधी कमी होतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2008 04:43 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2008 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close