S M L

पुण्यात 2 बिल्डर, 2 नगरसेवक अटकेत

29 एप्रिलजमीन गैरव्यवहारप्रकरणी पुण्यात दोन बडे बिल्डर आणि दोन नगरसेवकांना सीआयडीने अटक केली आहे. बाणेरमधील जमीन खरेदी प्रकरणी गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांनाअटक करण्यात आली आहे. बिल्डर रामकुमार अग्रवाल, रवींद्र सांकला आणि पुण्याचे नगरसेवक अजय भोसले, पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजेश पिल्ले अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. प्रदीप दोरगे यांनी या चार जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चतुःश्रृंगी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यावरुन ही कारवाई झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना धमकीपुण्यात बिल्डरकडून ज्येष्ठ नागरिकांना धमकावण्याचे प्रकार अजूनही सुरू आहेत. कोथरूड इथे राहणार्‍या विजया जोशी या 87 वर्षांच्या महिलेला बिल्डर धमकावत असल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. जोशी या निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. आपल्या मालकीच्या जागेतून बिल्डर निलेश सांबारी हे बेकायदेशीरपणे ड्रेनेज लाईन टाकत असल्याची तक्रार जोशींनी पोलीस आणि महापालिकेकडे केली आहे.पण यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे. यामुळे त्यांना आणि त्यांच्या मुलीला प्रचंड दहशतीखाली राहावे लागत आहे. जोशी यांनी याप्रकरणी आर.आर. पाटलांनाही पत्र लिहून दाद मागितली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2010 03:20 PM IST

पुण्यात 2 बिल्डर, 2 नगरसेवक अटकेत

29 एप्रिल

जमीन गैरव्यवहारप्रकरणी पुण्यात दोन बडे बिल्डर आणि दोन नगरसेवकांना सीआयडीने अटक केली आहे.

बाणेरमधील जमीन खरेदी प्रकरणी गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांनाअटक करण्यात आली आहे.

बिल्डर रामकुमार अग्रवाल, रवींद्र सांकला आणि पुण्याचे नगरसेवक अजय भोसले, पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजेश पिल्ले अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.

प्रदीप दोरगे यांनी या चार जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चतुःश्रृंगी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यावरुन ही कारवाई झाली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना धमकी

पुण्यात बिल्डरकडून ज्येष्ठ नागरिकांना धमकावण्याचे प्रकार अजूनही सुरू आहेत. कोथरूड इथे राहणार्‍या विजया जोशी या 87 वर्षांच्या महिलेला बिल्डर धमकावत असल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

जोशी या निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. आपल्या मालकीच्या जागेतून बिल्डर निलेश सांबारी हे बेकायदेशीरपणे ड्रेनेज लाईन टाकत असल्याची तक्रार जोशींनी पोलीस आणि महापालिकेकडे केली आहे.

पण यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे. यामुळे त्यांना आणि त्यांच्या मुलीला प्रचंड दहशतीखाली राहावे लागत आहे.

जोशी यांनी याप्रकरणी आर.आर. पाटलांनाही पत्र लिहून दाद मागितली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2010 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close