S M L

संघ मुख्यालयात भाजपच्या बैठकी

30 एप्रिलनागपूरमधील संघ मुख्यालयात गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या महत्वाच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. दिल्लीत आयोजित भाजपच्या महारॅलीच्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी संघप्रमुख मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरीनी भागवतांशी बंद खोलीत चर्चा केली. मध्यप्रदेशचे शिवराजसिंह चौहान यांनीही भागवतांशी चर्चा केली. भाजपमधून बडतर्फ झालेल्या उमा भारतींना पक्षात प्रवेश देण्यासंबंधी ही चर्चा असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यासोबतच येत्या काही दिवसांत विविध राज्यांतील भाजप संघटनांमध्ये बदल होणार आहे. त्या संबधी संघाचे मत जाणून घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली आहे. उमा भारतींना भाजपमध्ये परत घेण्यासाठी नितीन गडकरी अनुकूल आहेत. पण पक्षातील अनेक लोकांचा याला विरोध आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2010 12:07 PM IST

संघ मुख्यालयात भाजपच्या बैठकी

30 एप्रिल

नागपूरमधील संघ मुख्यालयात गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या महत्वाच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत.

दिल्लीत आयोजित भाजपच्या महारॅलीच्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी संघप्रमुख मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली होती.

त्यानंतर आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरीनी भागवतांशी बंद खोलीत चर्चा केली. मध्यप्रदेशचे शिवराजसिंह चौहान यांनीही भागवतांशी चर्चा केली.

भाजपमधून बडतर्फ झालेल्या उमा भारतींना पक्षात प्रवेश देण्यासंबंधी ही चर्चा असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यासोबतच येत्या काही दिवसांत विविध राज्यांतील भाजप संघटनांमध्ये बदल होणार आहे. त्या संबधी संघाचे मत जाणून घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली आहे.

उमा भारतींना भाजपमध्ये परत घेण्यासाठी नितीन गडकरी अनुकूल आहेत. पण पक्षातील अनेक लोकांचा याला विरोध आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2010 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close