S M L

आज मध्यरात्रीपासून 500-1000च्या नोटा वापरातून रद्द, पंतप्रधानांची घोषणा

Sachin Salve | Updated On: Nov 9, 2016 10:43 AM IST

आज मध्यरात्रीपासून 500-1000च्या नोटा वापरातून रद्द, पंतप्रधानांची घोषणा

08 नोव्हेंबर : काळा पैश्यावाल्यांचं कंबरडं मोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा करून आर्थिक भूकंप घडवलाय. आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केलीये. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. तुमच्याकडे असलेल्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत बँकेत बदलून घेता येईल.

 500-1000च्या नोटा बंद होणार

- आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद होणार

- काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

- आपल्याकडच्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा कराव्या लागणार

- नोटा बँकेत जमा करण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत

- उद्या 9 नोव्हेंबरला देशभरातल्या बँका बंद राहतील

- 9 नोव्हेंबरला आणि 10 नोव्हेंबरलाही एटीएम सेंटर्स बंद राहणार आहेत

- सीएनजी गॅस, पेट्रोल पंप, हॉस्पिटल आणि घाऊक बाजारात 11 नोव्हेंबरपर्यंत 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील

- यानंतर 500 रु. आणि 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार आहेत

- 30 डिसेंबरपर्यंत नोटा जमा करू शकता

- नोटा बदलण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड आवश्यक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2016 09:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close