S M L

...आणि राहुल गांधींनीही रांगेत उभं राहुन 4 हजार रुपये बदलून घेतले

Sachin Salve | Updated On: Nov 11, 2016 05:19 PM IST

...आणि राहुल गांधींनीही रांगेत उभं राहुन 4 हजार रुपये बदलून घेतले

11 नोव्हेंबर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही शुक्रवारी बँकेत हजेरी लावली. त्यांनी रांगेत उभं राहुन बँकेतून चार हजार रुपये बदलून घेतले. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या खासदार सुष्मिताही सोबत होत्या.

राहुल गांधी यांनी संसद मार्गावर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत 4 वाजेच्या सुमारास पोहोचले. आधीच लोकांची गर्दी असल्यामुळे राहुल गांधीही लोकांमध्ये सहभागी झाले. रांगेत उभं राहुन त्यांनी 4 हजार रुपये बदलून घेतले. काँग्रेसचे मोठा नेता आपल्यासोबत रांगेत उभा आहे पाहुन लोकांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. लोकांनी रांगा मोडून त्यांच्यासोबत सेल्फी काढले.

त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मी सर्वसामान्य लोकांसोबत आहे. त्यांचे दु:ख समजून घेण्यासाठी इथं आलोय आणि हे सरकारलाही समजले पाहिजे असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींच्या अचानकपणे बँकेत एंट्रीमुळे काहीकाळ वातावरण गोंधळले होते. राजकीय नेत्यांनी इथं येऊ नये अशी मागणीच लोकांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2016 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close