S M L

मिठ संपल्याची निव्वळ अफवा, विश्वास ठेवू नका !

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2016 01:02 PM IST

मिठ संपल्याची निव्वळ अफवा, विश्वास ठेवू नका !

11 नोव्हेंबर : एकीकडे देशभरात नोटा बदलण्यात सर्वसामान्य व्यस्त असताना मिठ संपल्याची अफवा पसरली. लखनऊमध्ये अचानकपणे मिठ संपल्याची अफवा उडाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. मुंबईतही याचे लोण पसरले असून मुंबईकरांनी दुकानात गर्दी केलीये. दुकानात 200 ते 400 किलोने मिठ विक्री होत असल्याचं समोर आलंय. मात्र, देशात कुठेही मिठ संपणार नाही हे निव्वळ अफवा असून लोकांनी यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय.

उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशसह अनेक शहरांमध्ये मिठ संपल्याची अफवा पसरली. दिल्लीतही याचे लोण पसरले. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिल्लीत मिठ संपले नाही लोकांनी अफवावर विश्वास ठेऊ नये असं आवाहन ट्विटरवरुन केलं.

परंतु, लखनऊ, कानपूर, इलाहाबाद, संभल, मुरादाबादसह अनेक शहरात मिठ अव्वाच्या सव्वा दराने विक्री झाली. थोडे थोडके नाहीतर 200 ते 400 रुपये किलोच्या दराने मिठाची विक्री झाली. अखेर पोलिसांनाच हस्तक्षेप करून ही अफवा असल्याचं लोकांना समजावून सांगावं लागलं. मुंबईतही या अफवेला पेव फुटला. लोकांनी दुकानात जाऊन मिठ खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केलीये. डोंबिवली, नागपाडा, कुर्ल्यात मिठ खरेदीसाठी झुंबड उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने खबरदारी घेत मिठ संपल्याची निव्वळ अफवा असून अशी अफवा जर कुणी पसरवत असेल तर कारवाई केली जाईल असा इशारा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2016 11:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close