S M L

फहीम आणि सबाउद्दीनच्या विरोधात अपिल करणार

3 मे आज स्पेशल कोर्टाने निर्दोष मुक्त केलेले 26/11तील आरोपी फहीम मोहम्मद युसुफ अन्सारी आणि सबाउद्दीन यांच्याविरोधात आमच्याकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे आम्ही या दोघांना शिक्षा व्हावी यासाठी अपिल करणार आहोत, असे गृहमंत्री आर. आर. पाटील तसेच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. निकालानंतर मीडियाशी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, कसाब एकूण 86 आरोपांमध्ये दोषी ठरला आहे. फहीम आणि सबाउद्दीन कुरेशीला निर्दोष मुक्त केले असले तरी त्यांना केवळ संशयाचा फायदा देण्यात आलेला आहे. त्यांना 'बाईज्जत बरी' केलेले नाही. आज कोर्टाने मान्य न केलेले पुरावे पुढे मान्य होतील, अशी आम्हाला आशा आहे. फहीम आणि सबाउद्दीनचा 26/11च्या हल्ल्यात सक्रीय सहभाग आहे. त्यांच्यावर मुंबईतील वेगवेगळ्या जागांचे नकाशे पुरवण्याची जबाबदारी 'लष्कर-ए-तोयबा'ने सोपवली होती. मुंबई हल्ल्याच्या वेळी कसाबसोबत पकडलेल्या अबू इस्माईल या दहशतवाद्याच्या खिशात नकाशा मिळाला. हा नकाशा फहीमने बनवला आहे. हा पोलिसांनी बनवल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केला. पण याच फहीमकडून उत्तरप्रदेशात एटीएसने 10 नकाशे जप्त केले याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.26/11च्या 10 फेब्रुवारीलाच त्याच्याकडून हे नकाशे मिळाले. याबाबत एक महत्त्वाचा साक्षीदार आमच्याकडे आहे. जानेवारी 2008च्या अगोदर काठमांडूत फहीमने यातील काही नकाशे सबाउद्दीनला दिले. झक उल रेहमान लखवीचे काम केले का? असा प्रश्नही सबाउद्दीनने त्यावेळी विचारला. हे नकाशे कशासाठी आहेत, या प्रश्नावर पाकिस्तानातून आपले काही दोस्त येत आहेत, त्यांना देण्यासाठी आहेत, असे फहीम म्हणाला होता. ही सर्व साखळी आम्ही कोर्टासमोर मांडली. पण ती कोर्टाने मान्य केली माही. पण हा कोर्टाचा अंतिम फैसला नाही. याविरोधात आम्ही अपिल करणार आहोत. हे दोघेही रामपूरमधील सीआरपीएफ कँप आणि बंगळुरूमधील आयआयएससीवरील हल्ल्यातील प्रमुख आरोपी आहेत. त्यामुळे ते कोठडीतच राहणार आहेत. पण यानिमित्ताने आम्ही पाकिस्तानात दहशतवाद्यांना कसे प्रशिक्षण दिले जाते, हा हल्ला म्हणजे भारताविरुद्धचे युद्धच होते, हाफीज सईद, लखवी आणि त्यांचे इतर साथीदार या हल्ल्याच्या मागे होते, हे आम्ही सिद्ध केले आहे, असे निकम म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2010 11:24 AM IST

फहीम आणि सबाउद्दीनच्या विरोधात अपिल करणार

3 मे

आज स्पेशल कोर्टाने निर्दोष मुक्त केलेले 26/11तील आरोपी फहीम मोहम्मद युसुफ अन्सारी आणि सबाउद्दीन यांच्याविरोधात आमच्याकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे आम्ही या दोघांना शिक्षा व्हावी यासाठी अपिल करणार आहोत, असे गृहमंत्री आर. आर. पाटील तसेच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.

निकालानंतर मीडियाशी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, कसाब एकूण 86 आरोपांमध्ये दोषी ठरला आहे. फहीम आणि सबाउद्दीन कुरेशीला निर्दोष मुक्त केले असले तरी त्यांना केवळ संशयाचा फायदा देण्यात आलेला आहे. त्यांना 'बाईज्जत बरी' केलेले नाही. आज कोर्टाने मान्य न केलेले पुरावे पुढे मान्य होतील, अशी आम्हाला आशा आहे.

फहीम आणि सबाउद्दीनचा 26/11च्या हल्ल्यात सक्रीय सहभाग आहे. त्यांच्यावर मुंबईतील वेगवेगळ्या जागांचे नकाशे पुरवण्याची जबाबदारी 'लष्कर-ए-तोयबा'ने सोपवली होती. मुंबई हल्ल्याच्या वेळी कसाबसोबत पकडलेल्या अबू इस्माईल या दहशतवाद्याच्या खिशात नकाशा मिळाला. हा नकाशा फहीमने बनवला आहे. हा पोलिसांनी बनवल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केला. पण याच फहीमकडून उत्तरप्रदेशात एटीएसने 10 नकाशे जप्त केले याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

26/11च्या 10 फेब्रुवारीलाच त्याच्याकडून हे नकाशे मिळाले. याबाबत एक महत्त्वाचा साक्षीदार आमच्याकडे आहे. जानेवारी 2008च्या अगोदर काठमांडूत फहीमने यातील काही नकाशे सबाउद्दीनला दिले. झक उल रेहमान लखवीचे काम केले का? असा प्रश्नही सबाउद्दीनने त्यावेळी विचारला. हे नकाशे कशासाठी आहेत, या प्रश्नावर पाकिस्तानातून आपले काही दोस्त येत आहेत, त्यांना देण्यासाठी आहेत, असे फहीम म्हणाला होता.

ही सर्व साखळी आम्ही कोर्टासमोर मांडली. पण ती कोर्टाने मान्य केली माही. पण हा कोर्टाचा अंतिम फैसला नाही. याविरोधात आम्ही अपिल करणार आहोत. हे दोघेही रामपूरमधील सीआरपीएफ कँप आणि बंगळुरूमधील आयआयएससीवरील हल्ल्यातील प्रमुख आरोपी आहेत. त्यामुळे ते कोठडीतच राहणार आहेत.

पण यानिमित्ताने आम्ही पाकिस्तानात दहशतवाद्यांना कसे प्रशिक्षण दिले जाते, हा हल्ला म्हणजे भारताविरुद्धचे युद्धच होते, हाफीज सईद, लखवी आणि त्यांचे इतर साथीदार या हल्ल्याच्या मागे होते, हे आम्ही सिद्ध केले आहे, असे निकम म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2010 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close