S M L

मुंबई लोकल विस्कळीत

3 मेअखेर चर्चेगेट स्टेशनवर अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. या प्रवाशांनी चर्चगेट स्टेशनवरील तिकीट खिडक्या तोडण्यास सुरुवात केली आहे. यात 5, 6, 7 आणि 9 नंबरच्या खिडक्या प्रवाशांनी तोडल्या आहेत. तसेच स्टेशनवरील रेल्वेच्या इतर मालमत्तेचेही जमावाने नुकसान केले आहे. स्टेेशनवर तैनात असणार्‍या आरपीएफचे जवान मात्र या संतापलेल्या लोकांना फारसा अटकाव करताना दिसत नाहीत. दरम्यान चर्चगेट स्टेशनवरून काही लोकल सुरू झाल्या आहेत. पण गोंधळ कायम आहे.रेल्वेच्या तिनही मार्गांवरील सर्व स्टेशनांवर प्रवासी अडकून पडले आहेत. स्टेशनवर कुठलीही अनाऊन्समेंट होत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. बसही भरून पाहत असल्याने अनेक प्रवासी पायीच घराकडे निघाले आहेत. सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस पूर्ण करून मुंबईकरांनी आज धावतपळत स्टेशन गाठले खरे. पण ऑफिस सुटण्याच्या ऐन गर्दीच्या वेळी लोकल बंद असण्याचा अनुभव सध्या बहुतेक चाकरमानी मुंबईकर घेत आहेत. कारण लोकल ट्रेनच्या मोटरमन्सनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे तीनही मार्गांवरील लोकलसेवा पूर्णपण विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वे तर पूर्णपणे ठप्प झाली आहे. चर्चगेट स्टेशनवरून एकही लोकल सुटणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्ग अवलंबावा, असे आवाहन रेल्वेकडून केले जात आहे. फास्ट लोकल स्लो करण्यात आल्या आहेत. तर लोकलसाठी एक्सप्रेसची इंजिने वापरली जात आहेत. तर बेस्टने चर्चगेट ते सांताक्रूझ अशी बससेवा उपलब्ध करून दिली आहे. या मोटरमन संघटनेने सकाळपासून उपाशीपोटी गाड्या चालवण्याचे आंदोलन सुरू केले आहे. यातील 39 मोटरमन्सची तब्येत ढासाळली असून त्यांना मोटरमनना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामुळे आता कामावरून घरी निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. नियमानुसार काम, मोटरमनची भरती आणि पगारवाढ या मोटरमन्सच्या प्रमुख मागण्या आहेत. आंदोलनावर मोटरमन ठाम राहिल्याने, रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारला पर्यायी बस सेवा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्याला प्रतिसाद देत परिवहन खात्याने बसेस उपलब्ध करुन दिल्या आहेत. बेस्टही त्यांच्या सगळ्या गाड्या रस्त्यावर आणणार आहे. तसेच रेल्वे सेवा कोलमडू नये म्हणून, रेल्वे प्रशासनानेही मध्य प्रदेशातून मेल एक्स्प्रेसचे ड्रायव्हर्स मागवून घेतले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2010 12:19 PM IST

मुंबई लोकल विस्कळीत

3 मे

अखेर चर्चेगेट स्टेशनवर अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. या प्रवाशांनी चर्चगेट स्टेशनवरील तिकीट खिडक्या तोडण्यास सुरुवात केली आहे.

यात 5, 6, 7 आणि 9 नंबरच्या खिडक्या प्रवाशांनी तोडल्या आहेत. तसेच स्टेशनवरील रेल्वेच्या इतर मालमत्तेचेही जमावाने नुकसान केले आहे. स्टेेशनवर तैनात असणार्‍या आरपीएफचे जवान मात्र या संतापलेल्या लोकांना फारसा अटकाव करताना दिसत नाहीत.

दरम्यान चर्चगेट स्टेशनवरून काही लोकल सुरू झाल्या आहेत. पण गोंधळ कायम आहे.

रेल्वेच्या तिनही मार्गांवरील सर्व स्टेशनांवर प्रवासी अडकून पडले आहेत. स्टेशनवर कुठलीही अनाऊन्समेंट होत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. बसही भरून पाहत असल्याने अनेक प्रवासी पायीच घराकडे निघाले आहेत.

सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस पूर्ण करून मुंबईकरांनी आज धावतपळत स्टेशन गाठले खरे. पण ऑफिस सुटण्याच्या ऐन गर्दीच्या वेळी लोकल बंद असण्याचा अनुभव सध्या बहुतेक चाकरमानी मुंबईकर घेत आहेत.

कारण लोकल ट्रेनच्या मोटरमन्सनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे तीनही मार्गांवरील लोकलसेवा पूर्णपण विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वे तर पूर्णपणे ठप्प झाली आहे.

चर्चगेट स्टेशनवरून एकही लोकल सुटणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्ग अवलंबावा, असे आवाहन रेल्वेकडून केले जात आहे.

फास्ट लोकल स्लो करण्यात आल्या आहेत. तर लोकलसाठी एक्सप्रेसची इंजिने वापरली जात आहेत.

तर बेस्टने चर्चगेट ते सांताक्रूझ अशी बससेवा उपलब्ध करून दिली आहे.

या मोटरमन संघटनेने सकाळपासून उपाशीपोटी गाड्या चालवण्याचे आंदोलन सुरू केले आहे. यातील 39 मोटरमन्सची तब्येत ढासाळली असून त्यांना मोटरमनना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामुळे आता कामावरून घरी निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

नियमानुसार काम, मोटरमनची भरती आणि पगारवाढ या मोटरमन्सच्या प्रमुख मागण्या आहेत.

आंदोलनावर मोटरमन ठाम राहिल्याने, रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारला पर्यायी बस सेवा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्याला प्रतिसाद देत परिवहन खात्याने बसेस उपलब्ध करुन दिल्या आहेत.

बेस्टही त्यांच्या सगळ्या गाड्या रस्त्यावर आणणार आहे. तसेच रेल्वे सेवा कोलमडू नये म्हणून, रेल्वे प्रशासनानेही मध्य प्रदेशातून मेल एक्स्प्रेसचे ड्रायव्हर्स मागवून घेतले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2010 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close