S M L

चर्चगेटवर प्रवाशांचा उद्रेक

3 मेमोटरमन संघटनेने केलेल्या उपास आंदोलनामुळे अखेर चर्चेगेट स्टेशनवर अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. या प्रवाशांनी चर्चगेट स्टेशनवरील तिकीट खिडक्या तोडल्या. 5, 6, 7 आणि 9 नंबरच्या खिडक्या प्रवाशांनी तोडल्या. तसेच स्टेशनवरील रेल्वेच्या इतर मालमत्तेचेही जमावाने नुकसान केले. स्टेशनवर तैनात असणार्‍या आरपीएफच्या जवानांनी मात्र या संतापलेल्या लोकांना फारसा अटकाव केला नाही. दरम्यान चर्चगेट स्टेशनवरून काही लोकल सुरू झाल्या. पण गोंधळ कायम राहिला. रेल्वेच्या तिनही मार्गांवरील सर्व स्टेशनांवर प्रवासी अडकून पडले. स्टेशनवर कुठलीही अनाऊन्समेंट होत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम होता. बसही भरून पाहत असल्याने अनेक प्रवासी पायीच घराकडे निघाले. दरम्यान सेंट्रल रेल्वने एक अडवायझरी काढली आहे. त्यात त्यांनी प्रवाशांना महत्त्वाच्या कामासाठीच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. मोटरमनच्या आंदोलनामुळे मंगळवारी कामगारांना कामावर एक तास उशीरा येण्याची आणि एक तास लवकर जाण्याची मुभा सरकारकडून देण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती कामगार विभागाचे सचिव कविता गुप्ता यांनी दिली आहे.दरम्यान संपावर गेलेल्या मोटरमन्सविरूध्द 'एस्मा' लागू करण्याची कारवाई सुरू झाली आहे. हे प्रकरण दिल्लीत पोहोचले असून संपावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मोटरमनच्या संपात राज्य सरकार मध्यस्थी करणार असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले. गरज पडली तर मोटरमनवर इस्मा कायद्याचा बडगा उगारणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधानांनीही या प्रकरणी हस्तक्षेप करावा, यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.मोटरमन्सच्या आंदोलनामुळे तीनही मार्गांवरील लोकलसेवा पूर्णपण विस्कळीत झाली. पश्चिम रेल्वे तर पूर्णपणे ठप्प झाली. चर्चगेट स्टेशनवरून एकही लोकल सुटणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्ग अवलंबावा, असे आवाहन रेल्वेकडून केले जात होती. फास्ट लोकल स्लो करण्यात आल्या. तर लोकलसाठी एक्सप्रेसची इंजिने वापरली गेली. तर बेस्टने चर्चगेट ते सांताक्रूझ अशी बससेवा उपलब्ध करून दिली. दरम्यान उपाशीपोटी गाड्या चालवणार्‍या 39 मोटरमन्सची तब्येत ढासाळली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. नियमानुसार काम, मोटरमनची भरती आणि पगारवाढ या मोटरमन्सच्या प्रमुख मागण्या आहेत. आंदोलनावर मोटरमन ठाम राहिल्याने, रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारला पर्यायी बस सेवा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्याला प्रतिसाद देत परिवहन खात्याने बसेस उपलब्ध करुन दिल्या आहेत. बेस्टही त्यांच्या सगळ्या गाड्या रस्त्यावर आणणार आहे. तसेच रेल्वे सेवा कोलमडू नये म्हणून, रेल्वे प्रशासनानेही मध्य प्रदेशातून मेल एक्स्प्रेसचे ड्रायव्हर्स मागवून घेतले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2010 03:03 PM IST

चर्चगेटवर प्रवाशांचा उद्रेक

3 मे

मोटरमन संघटनेने केलेल्या उपास आंदोलनामुळे अखेर चर्चेगेट स्टेशनवर अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. या प्रवाशांनी चर्चगेट स्टेशनवरील तिकीट खिडक्या तोडल्या. 5, 6, 7 आणि 9 नंबरच्या खिडक्या प्रवाशांनी तोडल्या. तसेच स्टेशनवरील रेल्वेच्या इतर मालमत्तेचेही जमावाने नुकसान केले. स्टेशनवर तैनात असणार्‍या आरपीएफच्या जवानांनी मात्र या संतापलेल्या लोकांना फारसा अटकाव केला नाही.

दरम्यान चर्चगेट स्टेशनवरून काही लोकल सुरू झाल्या. पण गोंधळ कायम राहिला.

रेल्वेच्या तिनही मार्गांवरील सर्व स्टेशनांवर प्रवासी अडकून पडले. स्टेशनवर कुठलीही अनाऊन्समेंट होत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम होता. बसही भरून पाहत असल्याने अनेक प्रवासी पायीच घराकडे निघाले. दरम्यान सेंट्रल रेल्वने एक अडवायझरी काढली आहे. त्यात त्यांनी प्रवाशांना महत्त्वाच्या कामासाठीच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

मोटरमनच्या आंदोलनामुळे मंगळवारी कामगारांना कामावर एक तास उशीरा येण्याची आणि एक तास लवकर जाण्याची मुभा सरकारकडून देण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती कामगार विभागाचे सचिव कविता गुप्ता यांनी दिली आहे.

दरम्यान संपावर गेलेल्या मोटरमन्सविरूध्द 'एस्मा' लागू करण्याची कारवाई सुरू झाली आहे. हे प्रकरण दिल्लीत पोहोचले असून संपावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मोटरमनच्या संपात राज्य सरकार मध्यस्थी करणार असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले. गरज पडली तर मोटरमनवर इस्मा कायद्याचा बडगा उगारणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधानांनीही या प्रकरणी हस्तक्षेप करावा, यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मोटरमन्सच्या आंदोलनामुळे तीनही मार्गांवरील लोकलसेवा पूर्णपण विस्कळीत झाली. पश्चिम रेल्वे तर पूर्णपणे ठप्प झाली. चर्चगेट स्टेशनवरून एकही लोकल सुटणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्ग अवलंबावा, असे आवाहन रेल्वेकडून केले जात होती. फास्ट लोकल स्लो करण्यात आल्या. तर लोकलसाठी एक्सप्रेसची इंजिने वापरली गेली.

तर बेस्टने चर्चगेट ते सांताक्रूझ अशी बससेवा उपलब्ध करून दिली.

दरम्यान उपाशीपोटी गाड्या चालवणार्‍या 39 मोटरमन्सची तब्येत ढासाळली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

नियमानुसार काम, मोटरमनची भरती आणि पगारवाढ या मोटरमन्सच्या प्रमुख मागण्या आहेत. आंदोलनावर मोटरमन ठाम राहिल्याने, रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारला पर्यायी बस सेवा उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

त्याला प्रतिसाद देत परिवहन खात्याने बसेस उपलब्ध करुन दिल्या आहेत. बेस्टही त्यांच्या सगळ्या गाड्या रस्त्यावर आणणार आहे. तसेच रेल्वे सेवा कोलमडू नये म्हणून, रेल्वे प्रशासनानेही मध्य प्रदेशातून मेल एक्स्प्रेसचे ड्रायव्हर्स मागवून घेतले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2010 03:03 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close