S M L

बँकेत रांगा टाळण्यासाठी आता ग्राहकांच्या बोटाला मतदानाची शाई

Sachin Salve | Updated On: Nov 15, 2016 03:30 PM IST

बँकेत रांगा टाळण्यासाठी आता ग्राहकांच्या बोटाला मतदानाची शाई

15 नोव्हेंबर : आता तुम्ही जर बँकेत नोटा बदलण्यासाठी जाणार असाल तर तुमच्या बोटावर मतदानाची शाई लावली जाणार आहे. ही शक्कल लढवलीय ती  बँकेबाहेर रांगा टाळण्यासाठी.

नोटा बदलण्यासाठी लोकांनी बँकाबाहेर तुफान गर्दी केलीये. पैस काढण्याची मर्यादा असल्यामुळे तेच तेच लोक पैसे बदलण्यासाठी बँकेत येत असल्यामुळे रांगा असल्याचं निरीक्षण केंद्रीय अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी नोंदवलंय. त्यावर उपाय म्हणून मतदानातल्या शाईचा वापर केला जाणार आहे. जसं दुबार मतदान टाळता येतं तसंच दुस-यांदा पैसे काढणं टाळण्यासाठी ही शक्कल लढवण्यात आलीय. तसंच

कापसाने कोणत्याही नोटेले खासल्यास त्याचा रंग जातोच आणि ज्या नोटीचा रंग जात नाही ती खोटी नोट असते असा दावाही दास यांनी केला.

सोशल मीडियावर काही अफवा पसरवल्या जात आहे त्यावर विश्वास ठेऊ नका, चलनात पुरतील एवढ्या आपल्याकडे नोटा उपलब्ध आहे, त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही असं आवाहनही दास यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 15, 2016 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close