S M L

मोदी सरकारचं पहिलंवहिलं सर्वसमावेशक बजेट 1 फेब्रुवारीला

Sachin Salve | Updated On: Nov 15, 2016 06:24 PM IST

मोदी सरकारचं पहिलंवहिलं सर्वसमावेशक बजेट 1 फेब्रुवारीला

15 नोव्हेंबर : दरवर्षी रेल्वे आणि अर्थ संकल्प दोन वेगवेगळ्या दिवशी सादर केले जात होते. मात्र, आता यापुढे एकत्र बजेट सादर होणार आहे. सर्वसमावेशक बजेट पुढील वर्षी 1 फेब्रुवारी 2016 रोजी सादर होणार आहे.

मोदी सरकारने बजेट 'परीक्षा' दिल्यानंतर या प्रथेतच बदल घडवून आणले. दरवर्षी रेल्वे आणि अर्थसंकल्प वेगवेगळा सादर होत होता. रेल्वे बजेटमध्ये दरवर्षी नव्या गाड्या, भाडेवाढ, नव्या योजना आणि रेल्वेच्या कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला गेला. तब्बल 92 वर्ष ही परंपरा कायम होती.

तर अर्थसंकल्पात टॅक्स, स्वस्त-महाग, व्याजदर आणि इतर अन्य गोष्टींचा लेखाजोखा मांडला जात होता. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बजेट सादर होत होते.

पण आर्थिक वर्षात बजेटची अंमलबजावणी करण्यात उशीर होत होती. त्यामुळे दोन्ही बजेट एकत्र घेण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. त्यानुसार आता 1 फेब्रुवारीला सर्वसमावेशक बजेट संसदेत सादर होणार आहे. साहजिकच हे बजेट कसं असणार आहे याबद्दल संपूर्ण देशाला याबद्दल उत्सुक्ता असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 15, 2016 06:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close