S M L

संसदेत आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर ‘नोटाबंदी’चं सावट

Samruddha Bhambure | Updated On: Nov 16, 2016 01:26 PM IST

संसदेत आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर ‘नोटाबंदी’चं सावट

16 नोव्हेंबर : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून, नोटा बंदी, 'वन रँक, वन पेन्शन', आणि इतर विषयांवरून मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. तर विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यास सत्ताधाऱ्यांनीही रणनिती आखली आहे.

अधिवेशनाचा पहिला दिवस गोंधळात जाणार आहे, हे दिसत आहे. संसदेत सरकारची कोंडी करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येत नोटा बंदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मोट बांधली. तर विरोधकांच्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं याबाबत रणनिती मंत्रीमंडळाच्या बैठकतीत ठरवण्यात आली.वन रँक वन पेन्शनवरून विरोधक सरकारकडून स्पष्टीकरण मागण्याची शक्यता आहे. शिवाय, नोटा बंदीमुळे नागरिकांचे हाल होत असल्याने नोटा बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही विरोधक लावून धरतील.

दरम्यान, सरकारने संसदेत सादर करण्यासाठी ९ विधेयकांची यादी तयार केली आहे. सरकारच्या प्राधान्यक्रमानुसार लोकसभेत चार, तर राज्यसभेत प्रलंबित असलेली सहा विधेयके सरकार या अधिवेशनात मंजूर करवून घेऊ इच्छित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 16, 2016 09:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close