S M L

राहुल गांधींना जामीन मंजूर, पुढची सुनावणी 28 जानेवारीला

Samruddha Bhambure | Updated On: Nov 16, 2016 11:24 AM IST

राहुल गांधींना जामीन मंजूर, पुढची सुनावणी 28 जानेवारीला

rAHUL IN BHIWANDI

16 नोव्हेंबर :  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भिवंडी कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला असून पुढची सुनावणी 28 जानेवारीला होणार आहे.

2014मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संघाच्या लोकांनीच महात्मा गांधींची हत्या केली, असं विधान राहुल गांधींनी केलं होतं. त्यानंतर राहुल गांधींनी माफी मागावी नाही तर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, असं संघाने म्हटलं होतं. मात्र राहुल गांधींनी माफी न मागितल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने राहुल गांधी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.

दरम्यान,  राहुल गांधींनी मोदींच्या नोटबंदीवर सडकून टीका केलीय. काळापैसा काढण्यासाठी नाही तर मोदी सरकारचा हा खुप मोठा घोटाळा असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. भिवंडीत कोर्टात राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे बहुतांश राज्यातले ज्येष्ठ नेते हजर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 16, 2016 11:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close