S M L

नोटबंदीप्रकरणी तृणमूल लोकसभेत स्थगन प्रस्ताव आणणार

Sachin Salve | Updated On: Nov 16, 2016 07:26 PM IST

नोटबंदीप्रकरणी तृणमूल लोकसभेत स्थगन प्रस्ताव आणणार

 

16 नोव्हेंबर : आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं. हे अधिवेशन नोटबंदीच्या निर्णयामुळे चांगलंच गाजणार आहे. सरकारच्या नोटाबंदीच्या विरोधात दिल्लीमध्ये विरोधक एकवटले आणि त्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेने संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा काढला आणि राष्ट्रपतींकडे निवेदन सादर केलं. नोटबंदीच्या निर्णयाचा निषेध करत त्यांनी राष्ट्रपतींना हे निवेदन दिलं. नोटबंदीप्रकरणी उद्या तृणमूल लोकसभेत स्थगन प्रस्ताव आणणार आहे.

जिल्हा बँका आणि अर्बन बँकांना जुन्या नोटा स्वीकारायला मनाई करण्यात आलीय. या मुद्द्यावर शिवसेना या मोर्चात सहभागी झाली. पण शिवसेना या मोर्चात सहभागी झाल्यामुळे अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी मोर्चामध्ये भाग घेणं टाळलं. राष्ट्रीय जनता दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसही या मोर्चात नव्हते.

विरोधकांच्या जोरदार गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. पण राज्यसभेमध्ये मात्र नोटबंदीच्या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सरकारवर जोरदार टीका केली. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांच्या रांगांमध्ये उभे असलेल्यांमध्ये एकही श्रीमंत माणूस दिसत नाही. पण गरिबांचे मात्र पैशाअभावी हाल होतायत. बंदी घातलेल्या नोटांपैकी 86 टक्के नोटा या चलनात आधीपासूनच होत्या, असंही आनंद शर्मा म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 16, 2016 07:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close