S M L

फाशीच्या अमलबजावणीसाठी प्रयत्न करणार

6 मेमुंबईवर हल्ला करणारा अतिरेकी अजमल कसाब याला मिळालेल्या फाशीची शिक्षेची लवकर अमलबजावणी होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटले आहे. फाशीची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असते. पण कसाबच्या बाबतीत शिक्षेच्या अमलबजावणीला वेळ लागू नये, यासाठी आम्ही केंद्राला विनंती करणार आहोत. शिवाय याबाबत हायकोर्टातून कन्फर्मेशन घेण्याची प्रकिया राज्य सरकार लवकरच पार पाडेल. आता कसाबला कुठे ठेवायचे, याचा निर्णय उद्या घेण्यात येईल, असेही आर. आर. यांनी या निमित्ताने स्पष्ट केले. याव्यतिरिक्त या खटल्यात पाकिस्तानातील 20 आरोपी आम्हाला हवे आहेत. त्यांच्या विरोधात आमच्याकडे पुरावेही आहेत. हे आरोपी ताब्यात मिळावेत, म्हणनू केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले. तसेच या खटल्याच्या निमित्ताने भारत हे 'सॉफ्ट टार्गेट' नाही, हे पाकिस्तानला आता कळून चुकले असेल, असेही गृहमंत्री म्हणाले. तर कसाबला फाशीच व्हावी ही जनतेची इच्छाच कोर्टाने शिक्षेच्या माध्यमातून पूर्ण केली आहे. आता या शिक्षेची अमलबजावणी करणे हे केंद्र सरकारच्या हातात आहे. कारण अफजल गुरूसारख्यांना अजूनही फाशी दिली गेलेली नाही, असे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी निदर्शनास आणून दिले. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख म्हणाले, या शिक्षेमुळे 26/11च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना समाधान वाटले असेल. हा हल्ला पाकिस्ताननेच केल्याचे कोर्टाने म्हटले आहे. शिक्षेची लवकर अमलबजावणी करण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू. या प्रक्रियेला वेळ लागू नये म्हणून आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. पण यानिमित्ताने आपण पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला चोख उत्तर दिले आहे, हे निश्चित.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2010 10:39 AM IST

फाशीच्या अमलबजावणीसाठी प्रयत्न करणार

6 मे

मुंबईवर हल्ला करणारा अतिरेकी अजमल कसाब याला मिळालेल्या फाशीची शिक्षेची लवकर अमलबजावणी होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटले आहे.

फाशीची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असते. पण कसाबच्या बाबतीत शिक्षेच्या अमलबजावणीला वेळ लागू नये, यासाठी आम्ही केंद्राला विनंती करणार आहोत. शिवाय याबाबत हायकोर्टातून कन्फर्मेशन घेण्याची प्रकिया राज्य सरकार लवकरच पार पाडेल. आता कसाबला कुठे ठेवायचे, याचा निर्णय उद्या घेण्यात येईल, असेही आर. आर. यांनी या निमित्ताने स्पष्ट केले.

याव्यतिरिक्त या खटल्यात पाकिस्तानातील 20 आरोपी आम्हाला हवे आहेत. त्यांच्या विरोधात आमच्याकडे पुरावेही आहेत. हे आरोपी ताब्यात मिळावेत, म्हणनू केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले. तसेच या खटल्याच्या निमित्ताने भारत हे 'सॉफ्ट टार्गेट' नाही, हे पाकिस्तानला आता कळून चुकले असेल, असेही गृहमंत्री म्हणाले.

तर कसाबला फाशीच व्हावी ही जनतेची इच्छाच कोर्टाने शिक्षेच्या माध्यमातून पूर्ण केली आहे. आता या शिक्षेची अमलबजावणी करणे हे केंद्र सरकारच्या हातात आहे. कारण अफजल गुरूसारख्यांना अजूनही फाशी दिली गेलेली नाही, असे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी निदर्शनास आणून दिले.

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख म्हणाले, या शिक्षेमुळे 26/11च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना समाधान वाटले असेल. हा हल्ला पाकिस्ताननेच केल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

शिक्षेची लवकर अमलबजावणी करण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू. या प्रक्रियेला वेळ लागू नये म्हणून आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. पण यानिमित्ताने आपण पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला चोख उत्तर दिले आहे, हे निश्चित.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2010 10:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close