S M L

याचसाठी केला होता अट्टाहास...

6 मे मुंबईवर हल्ला करून 166 निरपराध लोकांना बळी घेणार्‍या अजमल कसाबला आज कोर्टाने फाशीची शिक्षा दिली...हा दहशतवादाविरुद्धचा खटला कोर्टात लढून मी 26/11तील पीडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे...आणि याबद्दल मी आज समाधानी आहे, असे भावुक उद्गार विशेष सरकारी वकील, उज्ज्वल निकम यांनी आज 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना काढले.एरवी कोर्टाबाहेरच्या तुडुंब मीडियाला करड्या आवाजात, दमात घेणारे, आपुलकीच्या धाकात ठेवणारे उज्ज्वल निकम यांनी आज खटला संपल्यानंतर आपली कृतार्थता व्यक्त केली. 1993 पासून मी आर्थर रोड जेलमध्ये खटले चालवतोय. 1993चे बॉम्बस्फोट, दहशतवादी अबू सालेमचा खटला आणि आजचा फाशी मिळालेला कसाबचा खटला. कसाबसोबतच माझी या जेलमधून सुटका झाली, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली. या खटल्याशी लाखो सर्वसामान्य नागरिक जोडले गेले आहेत. आज कोर्टाबाहेर आल्यावर लोक माझ्यावर फुलं उधळत होते...माझं अभिनंदन करत होते...घडीभर मला जणू बॉलिवूडचा हिरोच झाल्याचा भास झाला...असेही गंमतीने निकम म्हणाले.खरे तर भक्कम पुरावे असूनही या खटल्यातील फहीम आणि सबाउद्दीन हे दोन अतिरेकी संशयाच्या फायद्यामुळे सुटले. त्याचा मला धक्का बसला...मी विमनस्क झालो...पण लोकांच्या अपेक्षांचं ओझं आपल्यावर आहे...आपल्याला निराश होऊन चालणार नाही...कसाई कसाबला आपल्याला शिक्षा द्यायची आहे, या विचाराने मला पुन्हा उभारी दिली. आणि आज कोर्टात कसाबला फाशीची शिक्षा का हवी, यावर तब्बल दोन तास घणाघाती युक्तीवाद केला. आणि कसाब हा माणसं मारण्याचं मशीन आहे. तसेच ही मशीन बनवण्याची फॅक्टरी पाकिस्तानात आहे, हे मी कोर्टाला पटवून दिलं...फाशीची शिक्षा मागताना सूडाची भावना नसावी. पण गुन्हेगाराने केलेल्या कृत्याचा त्याला धडा मिळाला पाहिजे. भविष्यात कोणी असे कृत्य करून नये, आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहू नये, यासाठी मी लढलो, असे त्यांनी नमूद केले. तर 'मला माझ्या पतीचा अभिमान वाटतो. देशाकडे पुन्हा कोणी वाकड्या नजरेने पाहू नये म्हणून ते सीमेवरच्या सैनिकाप्रमाणे कोर्टात उभे होते', असे कौतुकोद्गार निकम यांच्या पत्नीने काढले. तर कुटुंबाने पाठींबा दिला म्हणूनच मी कणखरपणे हा खटला लढू शकलो. 1993 पासून मी जळगावहून मुंबईला येतो. बाहेरच्या जेवणाने त्रास होतो, म्हणून पत्नी मला सोबत आठवड्याचे पीठ देते. कुटुंबाच्या त्यागामुळे मी गुन्हेगारांशी लढू शकतो. शिवाय माझ्या सुरक्षेचे काळजी घेणारे पीआय महाले, सर्वतोपरी सहकार्य करणारे सहकारी यांचा मी खूप आभारी आहे. शक्य झाले तर यावर मी कदाचित पुस्तकही लिहिन.., असा मनोदयही निकम यांनी यावेली व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2010 12:24 PM IST

याचसाठी केला होता अट्टाहास...

6 मे

मुंबईवर हल्ला करून 166 निरपराध लोकांना बळी घेणार्‍या अजमल कसाबला आज कोर्टाने फाशीची शिक्षा दिली...हा दहशतवादाविरुद्धचा खटला कोर्टात लढून मी 26/11तील पीडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे...आणि याबद्दल मी आज समाधानी आहे, असे भावुक उद्गार विशेष सरकारी वकील, उज्ज्वल निकम यांनी आज 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना काढले.

एरवी कोर्टाबाहेरच्या तुडुंब मीडियाला करड्या आवाजात, दमात घेणारे, आपुलकीच्या धाकात ठेवणारे उज्ज्वल निकम यांनी आज खटला संपल्यानंतर आपली कृतार्थता व्यक्त केली. 1993 पासून मी आर्थर रोड जेलमध्ये खटले चालवतोय. 1993चे बॉम्बस्फोट, दहशतवादी अबू सालेमचा खटला आणि आजचा फाशी मिळालेला कसाबचा खटला. कसाबसोबतच माझी या जेलमधून सुटका झाली, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली.

या खटल्याशी लाखो सर्वसामान्य नागरिक जोडले गेले आहेत. आज कोर्टाबाहेर आल्यावर लोक माझ्यावर फुलं उधळत होते...माझं अभिनंदन करत होते...घडीभर मला जणू बॉलिवूडचा हिरोच झाल्याचा भास झाला...असेही गंमतीने निकम म्हणाले.

खरे तर भक्कम पुरावे असूनही या खटल्यातील फहीम आणि सबाउद्दीन हे दोन अतिरेकी संशयाच्या फायद्यामुळे सुटले. त्याचा मला धक्का बसला...मी विमनस्क झालो...पण लोकांच्या अपेक्षांचं ओझं आपल्यावर आहे...आपल्याला निराश होऊन चालणार नाही...कसाई कसाबला आपल्याला शिक्षा द्यायची आहे, या विचाराने मला पुन्हा उभारी दिली. आणि आज कोर्टात कसाबला फाशीची शिक्षा का हवी, यावर तब्बल दोन तास घणाघाती युक्तीवाद केला. आणि कसाब हा माणसं मारण्याचं मशीन आहे. तसेच ही मशीन बनवण्याची फॅक्टरी पाकिस्तानात आहे, हे मी कोर्टाला पटवून दिलं...

फाशीची शिक्षा मागताना सूडाची भावना नसावी. पण गुन्हेगाराने केलेल्या कृत्याचा त्याला धडा मिळाला पाहिजे. भविष्यात कोणी असे कृत्य करून नये, आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहू नये, यासाठी मी लढलो, असे त्यांनी नमूद केले.

तर 'मला माझ्या पतीचा अभिमान वाटतो. देशाकडे पुन्हा कोणी वाकड्या नजरेने पाहू नये म्हणून ते सीमेवरच्या सैनिकाप्रमाणे कोर्टात उभे होते', असे कौतुकोद्गार निकम यांच्या पत्नीने काढले.

तर कुटुंबाने पाठींबा दिला म्हणूनच मी कणखरपणे हा खटला लढू शकलो. 1993 पासून मी जळगावहून मुंबईला येतो. बाहेरच्या जेवणाने त्रास होतो, म्हणून पत्नी मला सोबत आठवड्याचे पीठ देते. कुटुंबाच्या त्यागामुळे मी गुन्हेगारांशी लढू शकतो. शिवाय माझ्या सुरक्षेचे काळजी घेणारे पीआय महाले, सर्वतोपरी सहकार्य करणारे सहकारी यांचा मी खूप आभारी आहे. शक्य झाले तर यावर मी कदाचित पुस्तकही लिहिन.., असा मनोदयही निकम यांनी यावेली व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2010 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close