S M L

... तर शत्रूंचे डोळे काढून त्यांच्या हातात देऊ - पर्रिकर

Samruddha Bhambure | Updated On: Nov 27, 2016 01:25 PM IST

Defence minister parrikar

27 नोव्हेंबर :  भारताला युद्ध नकोय, पण आम्हाला डिवचले तर शत्रूंचे डोळे काढून त्यांच्या हातात देऊ, असा खणखणीत इशारा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानला दिला आहे. ते गोव्यातील एका सभेत बोलत होते.

गोव्यातील हळदोना विधानसभा क्षेत्रात भाजपची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना त्यांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या पाकिस्तानला हा इशारा दिला.

आम्हाला लढण्यात रस नाही. मात्र, कुठल्याही देशाने आमच्यावर वाईट नजर टाकली, तर त्यांचे डोळे काढून हातात देऊ. तेवढी ताकद आमच्यात नक्कीच आहे, असा इशारा पर्रीकर यांनी दिला. आमच्या सीमा सुरक्षित आहेत. देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे. नोटबंदीनंतरही देशातील जनतेने त्याचा अनुभव घेतला आहे, असंही ते म्हणाले.

शत्रूच्या कानशिलात वाजवणाऱ्या व्यक्तिला केंद्रात पाठवल्याचं गोव्यातील लोक आता अभिमानाने सांगू शकतात असंही पर्रीकर म्हणाले. त्याचबरोबर, सीमेवर गेल्या तीन दिवसात गोळीबार झाला नाही. कारण जर त्यांनी एकदा गोळीबार करतील, तर आपण दोनवेळा करतो. आपण शत्रूला जशास तसे उत्तर देत आहोत. म्हणूनच ज्यावेळी त्यांना हे लक्षात आलं, त्यावेळी त्यांनी स्वत:हून हे थांबवण्याची मागणी केली.”, असे पर्रिकर म्हणाले.

सशस्त्र दल पुर्णपणे सज्ज आहे, असं सांगतानाच सशाची जरी शिकार करायची असेल तर वाघालाच मारायला चाललोय अशी तयारी करुन जाण्याचे बाळकडू आईकडून मिळाल्याचा टोलाही त्यांनी पाकला लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2016 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close