S M L

खलिस्तानी दहशतवादी हरमिंदर सिंग मिंटूला दिल्लीत अटक

Samruddha Bhambure | Updated On: Nov 28, 2016 01:17 PM IST

खलिस्तानी दहशतवादी हरमिंदर सिंग मिंटूला दिल्लीत अटक

mintoo-story_647_112816120511

२८ नोव्हेंबर : पंजाबमधल्या नाभा तुरुंगातून काल (रविवारी) सकाळी पळालेला खलिस्तानी दहशतवादी हरमिंदरसिंग मिंटूला अटक करण्यात आली आहे. अवघ्या 24 तासात दिल्ली पोलिसांनी मिंटूच्या मुसक्या पुन्हा आवळल्या आहे.

पोलिसांच्या वेषात नाभा कारागृहात घुसून १२ अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबारचा फायदा घेऊन मिंटू सहा कैद्यांना घेऊन पळाला होता. मिंटूला सोडवण्याचा कट रचणाऱ्या आणि तो तडीस नेणाऱ्या परमिंदरसिंग याला रविवारी संध्याकाळीच उत्तर प्रदेशातील शामली इथून अटक करण्यात आली. परमिंदरच्या अटकेमुळं मिंटूचा माग काढणं पोलिसांना सोपं गेलं.

मिंटू हा खलिस्तान लिबरेशन फ्रंटचा म्होरक्या असून त्याच्यावर दहापेक्षाही अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पंजाबमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर फरार झालेल्या मिंटूला पकडणं अत्यंत आवश्यक होतं. त्यामुळं पोलिसांनीही तातडीनं हालचाली केल्या. त्याच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2016 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close