S M L

बिल्डर लॉबीकडून तिवरांची कत्तल

अलका धुपकर, मुंबई10 मेदहिसरमध्ये बिल्डर लॉबीकडून तिवरांची कत्तल केली जात आहे. दहिसर ते भाईंदरदरम्यान असलेल्या तिवरांच्या या वनात मातीचे भराव टाकले जात आहेत. दहिसर लिंक रोडचे जे रहिवासी याविरोधात आवाज उठवत आहेत, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. याविरोधात जिल्हाधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी मात्र कोणतीही कारवाई करत नाहीत.या ठिकाणी तिवर पद्धतशीरपणे कापली जात आहेत. तर काही ठिकाणी पेट्रोल टाकून जाळलीही जात आहेत. तिवरांच्या या भरगच्च वनामध्ये ठिकठिकाणी डेब्रीजचे भराव टाकलेले दिसतात. साधी पायवाट असलेल्या या तिवरांमध्ये 15 दिवसांपूर्वीच डंपर, ट्रक आणि जेसीबी घुसवण्यात आले.आता तर इथे मिनी हायवेच तयार झाले आहेत.दहिसरमधील सर्व्हे नंबर 344 या प्लॉटवर पूर्वी मीठागर चालवले जात होते. पण 1988 नंतर इथे मीठाचे उत्पादन कधीच झाले नाही. तरीही या जमिनीवर असलेला मीठागरासाठीचा बांध दुरुस्त करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे परवानगी मागण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांच्या देखरेखीसह अन्य अटी घालून या बांध दुरुस्तीची परवानगी कोर्टाने दिली. पाच एप्रिलला जिल्हाधिकार्‍यांनी बांधाची उंची न वाढवता दुरुस्तीची मान्यताही दिली. परंतू प्रत्यक्षात या बांधाची उंची वाढवली जात आहे. तिवरांच्या या वनात कुणालाही प्रवेश करू दिला जात नाही. त्याला कारण दिले जाते की, ही जमीन खाजगी मालमत्ता आहे.या तिवरांमध्ये अशाच प्रकारे भराव टाकून एका बाजूला गणपत पाटील नगरातील झोपडपट्‌ट्या उभ्या राहिल्या आहेत. दुसर्‍या बाजूला बिल्डर लॉबीने सुरु केलेला डेब्रीज आणि मातीच्या भरावामुळे ही संपूर्ण तिवरेच नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या आणि कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे पुरावे दाखवूनही याबाबत प्रशासन मात्र कुठलीच कारवाई करायला तयार नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2010 09:42 AM IST

बिल्डर लॉबीकडून तिवरांची कत्तल

अलका धुपकर, मुंबई

10 मे

दहिसरमध्ये बिल्डर लॉबीकडून तिवरांची कत्तल केली जात आहे. दहिसर ते भाईंदरदरम्यान असलेल्या तिवरांच्या या वनात मातीचे भराव टाकले जात आहेत.

दहिसर लिंक रोडचे जे रहिवासी याविरोधात आवाज उठवत आहेत, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. याविरोधात जिल्हाधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी मात्र कोणतीही कारवाई करत नाहीत.

या ठिकाणी तिवर पद्धतशीरपणे कापली जात आहेत. तर काही ठिकाणी पेट्रोल टाकून जाळलीही जात आहेत. तिवरांच्या या भरगच्च वनामध्ये ठिकठिकाणी डेब्रीजचे भराव टाकलेले दिसतात. साधी पायवाट असलेल्या या तिवरांमध्ये 15 दिवसांपूर्वीच डंपर, ट्रक आणि जेसीबी घुसवण्यात आले.आता तर इथे मिनी हायवेच तयार झाले आहेत.

दहिसरमधील सर्व्हे नंबर 344 या प्लॉटवर पूर्वी मीठागर चालवले जात होते. पण 1988 नंतर इथे मीठाचे उत्पादन कधीच झाले नाही. तरीही या जमिनीवर असलेला मीठागरासाठीचा बांध दुरुस्त करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे परवानगी मागण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांच्या देखरेखीसह अन्य अटी घालून या बांध दुरुस्तीची परवानगी कोर्टाने दिली.

पाच एप्रिलला जिल्हाधिकार्‍यांनी बांधाची उंची न वाढवता दुरुस्तीची मान्यताही दिली. परंतू प्रत्यक्षात या बांधाची उंची वाढवली जात आहे. तिवरांच्या या वनात कुणालाही प्रवेश करू दिला जात नाही. त्याला कारण दिले जाते की, ही जमीन खाजगी मालमत्ता आहे.

या तिवरांमध्ये अशाच प्रकारे भराव टाकून एका बाजूला गणपत पाटील नगरातील झोपडपट्‌ट्या उभ्या राहिल्या आहेत. दुसर्‍या बाजूला बिल्डर लॉबीने सुरु केलेला डेब्रीज आणि मातीच्या भरावामुळे ही संपूर्ण तिवरेच नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

जिल्हाधिकार्‍यांच्या आणि कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे पुरावे दाखवूनही याबाबत प्रशासन मात्र कुठलीच कारवाई करायला तयार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2010 09:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close