S M L

ताडोबातील वाघांना आता सुरक्षा कवच

प्रशांत कोरटकर, नागपूर10 मे गेल्या अनेक वर्षांपासून सरकार दरबारी खितपत पडलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनची अधिसूचना काढण्यात आली आहे. यामुळे आता ताडोबातील वाघांना सुरक्षा कवच मिळाले आहे. मात्र माणूस विरुद्ध वाघ असा संघर्ष टाळण्यासाठी त्याची प्रभावी अंमलबजाववणी होणे गरजेचे आहे. राज्य सरकारने 2008 मध्ये या संबंधी समिती तयार केली होती. अखेर दोन वर्षानंतर 1102 चौरस किलोमीटरचा बफर झोन करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. देशातील 38 व्याघ्रप्रकल्पांपैकी ताडोबा सरकारसाठी पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी ताडोबाची पाहणी केली होती तेंव्हाच त्यांनी हे महत्त्व विषद केले होते. यानंतर राज्य सरकारचे डोळे उघडले आणि मग झटपट पावले उचलत बफर झोनचा निर्णय घेण्यात आला. ताडोबाचा व्याघ्र प्रकल्पातील 625.82 चौरस किलोमीटर भाग कोअर झोन म्हणून ओळखला जातो. ताडोबा बफर झोन मधील 79 गावांमध्ये चंद्रपूर वनविभागातील 66 आणि ब्रह्मपुरी विभागातील 13 गावांचा समावेश आहे. आता 1102 चौरस किलोमीटरचे बफर झोन तर मिळाले. पण वाघांसाठीचे इतर धोके कमी करण्याची मागणी होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाघांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. कारण आहे, वाघांच्या वस्तीत लोकांचा वाढणारा वावर. बफर झोनच्या निर्णयाची नीट अंमलबजावणी झाली, तरच ताडोबातील वाघ आणि परिसरातील माणूसही सुरक्षित राहू शकेल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2010 09:51 AM IST

ताडोबातील वाघांना आता सुरक्षा कवच

प्रशांत कोरटकर, नागपूर

10 मे

गेल्या अनेक वर्षांपासून सरकार दरबारी खितपत पडलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनची अधिसूचना काढण्यात आली आहे.

यामुळे आता ताडोबातील वाघांना सुरक्षा कवच मिळाले आहे. मात्र माणूस विरुद्ध वाघ असा संघर्ष टाळण्यासाठी त्याची प्रभावी अंमलबजाववणी होणे गरजेचे आहे.

राज्य सरकारने 2008 मध्ये या संबंधी समिती तयार केली होती. अखेर दोन वर्षानंतर 1102 चौरस किलोमीटरचा बफर झोन करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे.

देशातील 38 व्याघ्रप्रकल्पांपैकी ताडोबा सरकारसाठी पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी ताडोबाची पाहणी केली होती तेंव्हाच त्यांनी हे महत्त्व विषद केले होते. यानंतर राज्य सरकारचे डोळे उघडले आणि मग झटपट पावले उचलत बफर झोनचा निर्णय घेण्यात आला.

ताडोबाचा व्याघ्र प्रकल्पातील 625.82 चौरस किलोमीटर भाग कोअर झोन म्हणून ओळखला जातो. ताडोबा बफर झोन मधील 79 गावांमध्ये चंद्रपूर वनविभागातील 66 आणि ब्रह्मपुरी विभागातील 13 गावांचा समावेश आहे. आता 1102 चौरस किलोमीटरचे बफर झोन तर मिळाले. पण वाघांसाठीचे इतर धोके कमी करण्याची मागणी होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वाघांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. कारण आहे, वाघांच्या वस्तीत लोकांचा वाढणारा वावर. बफर झोनच्या निर्णयाची नीट अंमलबजावणी झाली, तरच ताडोबातील वाघ आणि परिसरातील माणूसही सुरक्षित राहू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2010 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close