S M L

गरिबांच्या हक्कासाठी लढणं हा गुन्हा आहे का ? -पंतप्रधान मोदी

Sachin Salve | Updated On: Dec 3, 2016 04:51 PM IST

गरिबांच्या हक्कासाठी लढणं हा गुन्हा आहे का ? -पंतप्रधान मोदी

03 नोव्हेंबर : गरिबांच्या हक्कासाठी लढणं हा गुन्हा आहे का ? मी तुमच्यासाठी लढा देत आहे. काही लोकं माझं काहीही करू शकत नाही ? मी फकीर माणूस आहे, झोळी घेऊन निघून जाईल असे भावनिक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुरादबादच्या रॅलीत काढले. तसंच तुमच्या जनधन खात्यात आलेला पैसा काढू नका असं आवाहनही मोदींनी जनतेला केलं.

उत्तरप्रदेशच्या मुरादाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परिवर्तन रॅली पार पडली. या रॅली पंतप्रधानांनी पुन्हा एकदा नोटाबंदीबाबत स्पष्टीकरण दिलं. घोषणा करणारे अनेक सरकार आले आणि गेले पण अंमलबजावणी करणारं हे आमचं पहिलं सरकार आहे. नोटाबंदीदरम्यान तुम्हाला कुणी पैसे दिले तर घेऊ नका, जर कुणी बळजबरी करत असेल तर मला पत्र लिहा असं आवाहनच मोदींनी केलं.

गरिबांच्या हक्कासाठी लढणं हा काय गुन्हा आहे का ?, मी तुमच्यासाठी लढत आहे. ही लोकं माझं काहीही करू शकत नाही. माझं काय मी फकीर माणूस आहे. झोळी घेऊन निघून जाईल. पण, गरिबांचे हात बळकट केले तर गरिबी दूर होऊन जाईल. जर विचार चांगले असतील तर देश काहीपण सहन करण्यासाठी तयार आहे. आणि हे मला जाणवलंय. देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचा इरादा आम्ही केलाय. पहिल्या सरकारने नोटा छापून सरकार चालवले असा टोलाही पंतप्रधानांनी काँग्रेसला लगावला.

पंतप्रधानांनी अखिलेश सरकारवरही निशाणा साधला. सरकार हे घोषणा करण्यासाठी नसतं. योजना तयार करून त्यावर काम केलं पाहिजे. कधीकाळी मध्यप्रदेश हे आजारी राज्य होतं. पण गेल्या 10 वर्षांमध्ये या राज्याची आजारातून सुटका झाली असून विकासनशील राज्यात त्यांची गनना होतेय. आपल्यासाठी आणि आपल्या माणसांसाठी काम करणारे सरकार आले आणि गेले पण आमचे सरकार तुमच्यासाठी काम करणारे सरकार आहे असंही मोदी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 3, 2016 04:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close