S M L

इस्त्रोची आणखी एक मोहीम फत्ते, रिसोर्स सॅटेलाईटचं यशस्वी प्रक्षेपण

Samruddha Bhambure | Updated On: Dec 7, 2016 12:21 PM IST

इस्त्रोची आणखी एक मोहीम फत्ते, रिसोर्स सॅटेलाईटचं यशस्वी प्रक्षेपण

07 डिसेंबर : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) मंगळवारी आणखी एक मोहीम फत्ते करून दाखली आहे. इस्रोने आज (बुधवारी) सतीश धवन अवकाश केंद्रातून रिमोट सेंसिंग उपग्रह रिसोर्ससॅट-2ए चं यशस्वी प्रक्षेपण केलं. सकाळी 10.24 वाजता पीएसएलव्ही-सी36च्या मदतीने इस्रोने हा उपग्रह अंतराळात सोडला. हा रिसोर्ससॅट-1 आणि 2 च्या सिरीजमधला उपग्रह आहे.

हा 1.235 किलो वजनाचा उपग्रह जमीनीतील साधनांची माहिती देणार आहे. उदाहरणार्थ, भारताची वनसंपदा आणि जलसंसाधने, खनिजांची माहिती घेणे या उपग्रहामुळे शक्य होणार आहे.  रिमोट भागातील म्हणजेच दूरच्या क्षेत्रातील डेटा मिळवण्यासाठी या सॅटेलाईटचा उपयोग होणार आहे. जगभर त्याचा वापर करता येणार आहे. त्यामुळे अंतराळ मोहिमांमधली भारताची ही मोठी कामगिरी आहे.

इस्त्रोनं जगभरातल्या देशांचे सॅटेलाईट व्यावसायिकरीत्या सोडायला घेतलेले आहेत. पीएसएलव्ही रॉकेटचं एक्सएल व्हर्जन यासाठी वापरण्यात आलं आहे. 1994 पासून 2016 पर्यंत म्हणजेच या 18 वर्षांत पीएसएलव्हीच्या माध्यमातून 36 यशस्वी प्रक्षेपणांतून 121 उपग्रह अंतराळात सोडण्यात भारत यशस्वी झाला आहे. यापैकी 79 उपग्रह परदेशी होते, तर 42 सॅटेलाईट हे आपले आहेत. आजचं सॅटेलाईट ह्या वर्षातलं शेवटचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2016 12:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close