S M L

जयललितांच्या निधनाच्या धक्क्याने 77 जणांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Dec 8, 2016 03:24 PM IST

जयललितांच्या निधनाच्या धक्क्याने 77 जणांचा मृत्यू

08 डिसेंबर :  तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाने तामिळी जनतेला शोक अनावर झाला आहे. अम्मांच्या मृत्यूचा आघात सहन न झाल्यामुळे 77 जणांनी प्राण गमावल्याची माहिती एआयडीएमके पक्षाने दिली आहे. एआयडीएमके पक्षाकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पक्षातील एका अधिकाऱ्याने प्राणत्याग करण्याचा प्रयत्न केला असून त्यांनाही 50 हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.

केंद्राकडून मात्र मृतांचा आकडा 30 असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये 4 आत्महत्यांचा समावेश आहे. एआयडीएमकेच्या पत्रकात 77 जणांच्या मृत्यूचा कालावधी स्पष्ट करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे मृत्यू जयललितांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हापासून म्हणजेच 22 सप्टेंबरपासून आहेत, की त्यांना आलेल्या कार्डिॲक अरेस्टनंतर, हे समजू शकलेलं नाही. मात्र तामिळनाडूच्या विविध भागात राहणाऱ्या 77 जणांची नावं नमूद करण्यात आली आहेत.

तब्बल 73 दिवसांपासून जयललिता फुफ्फुसाच्या विकारामुळं अपोलो रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र, सोमवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर तामिळनाडू राज्य शोकात बुडालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2016 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close