S M L

मोदींचा नोटबंदीचा निर्णय मूर्खपणाचा – राहुल गांधी

Samruddha Bhambure | Updated On: Dec 8, 2016 02:26 PM IST

rahul gandhi_4

08 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटाबंदीचा निर्णय हा बोल्ड नव्हे तर मूर्खपणाचा असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी राहुल गांधी बोलत होते.

 नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक महिना पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी 'काळा दिवस' पाळत संसद भवनाच्या आवारात जोरदार निदर्शनं केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर आणि पंतप्रधान मोदींवर थेट हल्ला चढवला.

'लोकांच्या त्रासाशी मोदींना काहीही देणंघेणं दिसत नाही. देशातील गरीब, शेतकरी, मजूर उद्ध्वस्त झाले आहेत आणि मोदी मजेत आहेत. यावर संसदेत मतदान घ्यायला हवं. आम्हाला खात्री आहे भाजपचे काही खासदार सरकारविरोधातच मतदान करतील, असं राहुल म्हणाले. मोदी बाहेर सगळीकडे बोलतात मात्र, संसदेत आम्ही त्यांना प्रश्न विचारू म्हणून ते इथे बोलत नाहीत. पण हे चालणार नाही, त्यांना बोलावच लागेल असंही ते म्हणाले आहेत.

'नोटांबदीनंतर पेटीएमसारख्या काही कंपन्यांची उलाढाल मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. हे ऑनलाइन ई-वॉलेट म्हणजे 'पे टू मोदी' आहे,' असा घणाघाती आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2016 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close