S M L

तिहेरी तलाक घटनाबाह्य, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय

Samruddha Bhambure | Updated On: Dec 8, 2016 01:45 PM IST

तिहेरी तलाक घटनाबाह्य, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय

08 डिसेंबर :  'मुस्लिम समाजात प्रचलित असलेली तिहेरी तलाकची प्रथा घटनाबाह्य असून मुस्लिम महिलांच्या अधिकारांचं उल्लंघन करणारी आहे,' असा महत्त्वपूर्ण निर्णय अलाहाबाद हायकोर्टाने दिला आहे. 'कोणताही पर्सनल लॉ बोर्ड घटनेपेक्षा मोठा नाही,' असंही कोर्टानं सुनावलं आहे. दरम्यान, तिहेरी तलाकचं समर्थन करणाऱ्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं मात्र अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाला आजच सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे.

तलाक, तलाक, तलाक असं तीन वेळा तोंडी म्हणून पत्नीपासून वेगळं होण्याची प्रथा मुस्लिम समाजात आहे. या प्रथेला काही मुस्लिम महिला आणि स्वयंसेवी संस्थांनी सुप्रीम कोर्टासह विविध हायकोर्टांमध्ये आव्हान दिलं. केंद्र सरकारनंही या अन्यायी प्रथेसाठी विरोध दर्शवला आहे. याच संदर्भातील एका याचिकेवर आज अलाहाबाद हायकोर्टा पुढं सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठानं तिहेरी तलाक (तोंडी तलाक) घटनाबाह्य असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी कोर्टाने कुराणाचाही दाखला दिला. तिहेरी तलाक प्रथेला कुराणातही आक्षेप घेण्यात आल्याचं खंडपीठानं निदर्शनास आणलं.

तर दुसरीकडे, धर्मानं दिलेले हक्क कोणत्याच कायद्याच्या परीक्षेत्रात येत नाहीत, अशी भूमिका ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2016 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close