S M L

मुंबईवर लोडशेडिंगची तलवार

12 मेमुंबईवरही आता लोडशेडिंगची टांगती तलवार आहे. टाटाने वीज न दिल्यास मुंबईत लोडशेडिंग करावे लागेल, असा इशारा रिलायन्सने दिला आहे. पुरेशी वीज उपलब्ध झाली नाही, तर महागड्या दराने वीज घ्यावी लागेल. ज्याचा भार ग्राहकांवर पडेल. नाही तर मुंबईच्या उपनगरामध्ये टप्प्या-टप्प्याने लोडशेडिंग करावे लागेल, असा इशारा रिलायन्सने दिला आहे. हा वाद नेमका काय आहे ते पाहूया...रिलायन्स एनर्जी मुंबई उपनगरातील 80 भागांना वीजपुरवठा करते. पण रिलायन्सकडे तेवढी वीज उपलब्ध नाही.त्यांच्याकडे फक्त 550 मेगावॅट वीज आहे, त्यामुळे उर्वरित 350 मेगावॅट वीज रिलायन्स टाटाकडून विकत घेते.पण सध्या टाटा आणि रिलायन्समधील करार संपला आहे. ही साडेतीनशे मेगावॅट वीज, टाटा, रिलायन्सला एमईआरसीच्यादराने देत होते. पण आता रिलायन्सला वीज घ्यायची असेल तर त्यांनी मार्केट दराप्रमाणे वीज घ्यावी, अशी भूमिकाटाटाने घेतली आहे. पण रिलायन्स यासाठी तयार नाही. कारण एमईआरसीचा दर आणि मार्केटचा दर यात दुपटीचा फरक आहे.त्यामुळे सरकारने यात मध्यस्थी करत टाटाने सध्याच्या भावानेच रिलायन्सला वीज देण्याचे आदेश दिलेत. पण टाटानेसरकारचे आदेश धुडकावत वीज देण्यास नकार दिला आहे. एकंदरीतच दोन्ही कंपन्यांच्या या पॉवर गेममध्ये भरडले जात आहेत, ते सामान्य मुंबईकर.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2010 02:45 PM IST

मुंबईवर लोडशेडिंगची तलवार

12 मे

मुंबईवरही आता लोडशेडिंगची टांगती तलवार आहे. टाटाने वीज न दिल्यास मुंबईत लोडशेडिंग करावे लागेल, असा इशारा रिलायन्सने दिला आहे.

पुरेशी वीज उपलब्ध झाली नाही, तर महागड्या दराने वीज घ्यावी लागेल. ज्याचा भार ग्राहकांवर पडेल.

नाही तर मुंबईच्या उपनगरामध्ये टप्प्या-टप्प्याने लोडशेडिंग करावे लागेल, असा इशारा रिलायन्सने दिला आहे.

हा वाद नेमका काय आहे ते पाहूया...

रिलायन्स एनर्जी मुंबई उपनगरातील 80 भागांना वीजपुरवठा करते. पण रिलायन्सकडे तेवढी वीज उपलब्ध नाही.

त्यांच्याकडे फक्त 550 मेगावॅट वीज आहे, त्यामुळे उर्वरित 350 मेगावॅट वीज रिलायन्स टाटाकडून विकत घेते.

पण सध्या टाटा आणि रिलायन्समधील करार संपला आहे. ही साडेतीनशे मेगावॅट वीज, टाटा, रिलायन्सला एमईआरसीच्यादराने देत होते. पण आता रिलायन्सला वीज घ्यायची असेल तर त्यांनी मार्केट दराप्रमाणे वीज घ्यावी, अशी भूमिकाटाटाने घेतली आहे.

पण रिलायन्स यासाठी तयार नाही. कारण एमईआरसीचा दर आणि मार्केटचा दर यात दुपटीचा फरक आहे.

त्यामुळे सरकारने यात मध्यस्थी करत टाटाने सध्याच्या भावानेच रिलायन्सला वीज देण्याचे आदेश दिलेत. पण टाटानेसरकारचे आदेश धुडकावत वीज देण्यास नकार दिला आहे.

एकंदरीतच दोन्ही कंपन्यांच्या या पॉवर गेममध्ये भरडले जात आहेत, ते सामान्य मुंबईकर.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2010 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close