S M L

ऑगस्टा प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एस.पी.त्यागी अटकेत

Sachin Salve | Updated On: Dec 9, 2016 09:12 PM IST

ऑगस्टा प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एस.पी.त्यागी अटकेत

09 डिसेंबर : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी माजी हवाईदल प्रमुख एस.पी. त्यागींना सीबीआयने अटक केलीय. एस.पी.त्यागी हे भ्रष्टाचार प्रकरणात अटक होणारे पहिलेच हवाईदल प्रमुख आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि आणखी काही बड्या नेत्यांच्या हेलिकॉप्टर खरेदीत हा घोटाळा झाला होता. याप्रकरणी गौतम खेतान आणि संजीव त्यागी यांनाही अटक करण्यात आलीय.

ऑगस्ट वेस्टलँड ही युकेमधली हेलिकॉप्टर बनवणारी कंपनी आहे. या कंपनीने हेलिकॉप्टर्सचं कंत्राट मिळवण्यासाठी काही भारतीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांना लाच दिली, असा आरोप सीबीआयने केलाय. माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी आणि 18 जणांना ही लाच देण्यात आली होती. यामध्ये एस. पी. त्यागी यांचे नातेवाईक आणि एका युरोपियन मध्यस्थाचा समावेश आहे.

एस. पी. त्यागी हे 2004 ते 2007 मध्ये हवाई दलप्रमुख होते. याच काळात त्यांनी ऑगस्टा वेस्टलँड कंपनीशी हे गैरव्यवहार केले, असा त्यांच्यावर आरोप आहे. व्हीआयपी नेत्यांसाठी हेलिकॉप्टर खरेदी करताना त्याची क्षमता 6 हजार मीटरवर उडण्याची असावी लागते. पण एस. पी. त्यागी यांनी ऑगस्टा वेस्टलँडसाठी हेलिकॉप्टरची क्षमता 4 हजार 500 फुटांवर आणली. त्यामुळे ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं.

ऑगस्टा वेस्टलँडशी केलेला हा खरेदी करार 2013 मध्ये रद्द करण्यात आला पण तोपर्यंत कंपनीकडून 3 हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2016 09:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close