S M L

सुषमा स्वराजांचं किडनी ट्रान्सप्लँट यशस्वी

Samruddha Bhambure | Updated On: Dec 10, 2016 08:46 PM IST

sushma swaraj on pak

10 डिसेंबर :  केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावरील किडनी ट्रान्सप्लँटची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. शनिवारी सकाळी सुरू झालेली ही शस्त्रक्रिया सुमारे पाच तास सुरू होती असं समजतं.

 दिल्लीतील एम्स रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. एम्सचे संचालक एम. सी. मिश्रा आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी सुषमा स्वराज यांचं किडनी प्रत्यारोपण केलं.

सकाळी साडे नऊ वाजता सुरू झालेली शस्त्रक्रिया दुपारी अडीच वाजेपर्यंत सुरू होती. सध्या सुषमा स्वराज यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलंय. 64 वर्षांच्या सुषमा स्वराज यांना दिर्घकाळापासून मधुमेह असल्यामुळे त्यांची किडनी निकामी झाली होती.

गेल्या महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर योग्य किडनी दाता मिळाल्यानंतर सुषमा स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2016 08:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close