S M L

चेन्नईत 'वरदाह' चक्रीवादळाचा तडाखा, दोघांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Dec 12, 2016 10:41 PM IST

 चेन्नईत 'वरदाह' चक्रीवादळाचा तडाखा, दोघांचा मृत्यू

BRKING940_201612121442_940x355

LIVE UPDATES :

  • वरदाह वादळाचे दोन बळी
  • दुपारी 2 ते 4च्या सुमारास वरदाह चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनार्‍यावर धडकलं
  • आंध्र प्रदेशवरही वादळाचं सावट, 50 हजार जणांना सुरक्षितस्थळी हलवलं
  • तामिळनाडूत 7 हजार 357 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं
  • तामिळनाडूत आज शाळा - कॉलेजेस आणि अनेक ऑफिसेस बंद
  • महाराष्ट्राच्या शेजारी 'वरदाह', मराठवाडासह विदर्भात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता
  • महाराष्ट्रात मराठवाड्यात काही ठिकाणी कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली येथे काही प्रमाणात पाऊस अपेक्षित

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

12 डिसेंबर :  अंदमान निकोबार बेटांना झोडपून काढणारं वरदाह वादळ आता चेन्नईच्या किनारपट्टीवर दाखल झालं आहे. या वादळामुळे चेन्नईसह तामिळनाडूतल्या अनेक भागात सोसाट्याच्या वार्‍यासह जोरदार पाऊस पडतोय. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीतल्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, वादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईसह तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. ताशी 40 ते 50 किमीच्या वेगाने वारे वाहणार आहेत. चेन्नईत अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे.

या वादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी एनडीआरएफचे 7  तामिळनाडूत तर 6 टीम्स आंध्र प्रदेशात तैनात ठेवण्यात आले आहेत. भारतीय नेव्हीलाही या वादळासंदर्भातला हाय अलर्ट पाठवण्यात आला आहे. येत्या 48 तासांत मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तामिळनाडू सरकराने वादळाने प्रभावित होऊ शकतील अशा भागांत आज सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे.

रविवारी तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी 'वर्दाह' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेतली. वादळाच्या पूर्वतयारीचा यात आढावा घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 12, 2016 08:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close