S M L

देशभरातल्या बँकांच्या 500 शाखांवर सरकारची करडी नजर

Samruddha Bhambure | Updated On: Dec 12, 2016 08:20 PM IST

A cashier displays the new 2000 Indian rupee banknotes inside a bank in Jammu

12 डिसेंबर : नोटंबदीनंतर देशभरातल्या बँकांच्या 500 शाखांच्या व्यवहारावर सरकारची करडी नजर आहे. बँकांमधल्या व्यवहारांची स्टिंग ऑपरेशन करण्यात येतायत. यामध्ये सरकारी आणि खाजगी बँकांचाही समावेश आहे. बँकांच्या व्यवहारामध्ये काळा पैसा पांढरा होतोय, हेही काही स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झालंय. या सगळ्या स्टिंग ऑपरेशनवर गुप्तचर यंत्रणांच्या आथिर्क विभागाची नजर आहे.

मुंबई, दिल्ली, बंगळुरू या महत्त्वाच्या शहरांमधल्या बँका गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर आहेत. यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, तामिळनाडू या राज्यांमधल्या बँकांचाही समावेश आहे. या बँकांमध्ये केल्या जाणाऱ्या स्टिंग ऑपरेशनचा अहवाल गुप्तचर यंत्रणा पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्रालय आणि गृहमंत्रालयाला सादर करणार आहेत.

नोटबंदीनंतर काही बँकांमध्ये संशयास्पद आथिर्क व्यवहार आढळलेत. ॲक्सिस बँकेच्या 19 अधिकाऱ्यांना आथिर्क गैरव्यवहार प्रकरणी निलंबित करण्यात आलं होतं. एटीएममध्ये नव्या नोटा नेतानाही गैरव्यवहार झाल्याच्या घटना घडल्यायत. यामध्ये बँकांच्या बाहेर परस्पर काळा पैसा पांढरा होतोय, असा सरकारला संशय आहे.त्यामुळे बँकांच्या व्यवहारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सरकारने गुप्तचर यंत्रणांना दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 12, 2016 07:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close