S M L

रिलायन्स-टाटा वाद कायम

13 मेमुंबईच्या वीजपुरवठ्यावरून टाटा पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्यातील वाद पेटला आहे. रिलायन्सला वीज न देण्याच्या निर्णयावर टाटा पॉवर ठाम आहे. टाटा पॉवरने राज्य सरकारला तसे पत्रच पाठवले आहे. सरकारने टाटा पॉवरला रिलायन्सला वीज देण्याचे निर्देश दिले होते. मात्र टाटाने त्याला नकार दिला. 5 रूपये 90 पैसे या दराने 200 मेगावॅट वीज आम्ही रिलायन्स इन्फ्राला द्यायला तयार आहोत. तसे आम्ही त्यांना कळवलेलेही आहे. पण रिलायन्स 4 रूपये 30 पैसे या दराने वीज मागत असल्याचे टाटा पॉवरचे म्हणणे आहे. 4 रूपये 30 पैसे हा दर आम्ही एमईआरसीशी केलेल्या करारानुसार फक्त बेस्टपुरताच लागू आहे. त्यामुळे या कराराशी रिलायन्स इन्फ्राशी काहीही संबंध नाही, असे टाटाचे म्हणणे आहे. मुंबईत लोडशेडिंगची गरज नाही. पण जर कुणाला लोडशेडिंग करायचे असेल तर आम्ही त्यावर काय बोलणार? असा टोला टाटा पॉवरने रिलायन्सला मारला आहे. मुंबईतील सध्याची वीज परिस्थिती अशी आहे...मुंबईमध्ये एकूण 3102 मेगावॉटची गरज आहे.पण सध्या 2277 मेगावॉटचा पुरवठा केला जातो.सध्या शहरात 825 मेगावॉटची तूट जाणवते.टाटा आणि रिलायन्स पॉवरमध्ये नेमका वाद असा आहे...एप्रिलपर्यंत टाटा पॉवर कंपनी रिलान्सला 460 मेगावॉट वीज पुरवत होती.मे महिन्यात सरकारने टाटा पॉवरला बेस्टला 100 तर रिलायन्सला 358 मेगावॉट वीज देण्याचे आदेश दिले.कंपनीला आपल्या ग्राहकांना पुरवठा करण्यासाठी ही वीज हवी असल्याचे म्हणत, टाटा पॉवरने हे आदेश धुडकावून लावले.ठराविक किंमतीत टाटा पॉवरकडून 358 मेगावॉट वीज मिळाली नाही तर आपल्याला इतर कंपन्यांकडून महाग दराने वीज घ्यावी लागेल आणि याची किंमत ग्राहकांना भरावी लागेल असे रिलायन्सचे म्हणणे आहे.या वादावर तोडगा निघाला नाही किंवा इतर पर्यायांकडून वीज मिळाली नाही तर लोडशेडिंग करावे लागणार असल्याचे रिलायन्सचे म्हणणे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2010 01:39 PM IST

रिलायन्स-टाटा वाद कायम

13 मे

मुंबईच्या वीजपुरवठ्यावरून टाटा पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्यातील वाद पेटला आहे. रिलायन्सला वीज न देण्याच्या निर्णयावर टाटा पॉवर ठाम आहे. टाटा पॉवरने राज्य सरकारला तसे पत्रच पाठवले आहे. सरकारने टाटा पॉवरला रिलायन्सला वीज देण्याचे निर्देश दिले होते. मात्र टाटाने त्याला नकार दिला.

5 रूपये 90 पैसे या दराने 200 मेगावॅट वीज आम्ही रिलायन्स इन्फ्राला द्यायला तयार आहोत. तसे आम्ही त्यांना कळवलेलेही आहे. पण रिलायन्स 4 रूपये 30 पैसे या दराने वीज मागत असल्याचे टाटा पॉवरचे म्हणणे आहे. 4 रूपये 30 पैसे हा दर आम्ही एमईआरसीशी केलेल्या करारानुसार फक्त बेस्टपुरताच लागू आहे. त्यामुळे या कराराशी रिलायन्स इन्फ्राशी काहीही संबंध नाही, असे टाटाचे म्हणणे आहे.

मुंबईत लोडशेडिंगची गरज नाही. पण जर कुणाला लोडशेडिंग करायचे असेल तर आम्ही त्यावर काय बोलणार? असा टोला टाटा पॉवरने रिलायन्सला मारला आहे.

मुंबईतील सध्याची वीज परिस्थिती अशी आहे...

मुंबईमध्ये एकूण 3102 मेगावॉटची गरज आहे.

पण सध्या 2277 मेगावॉटचा पुरवठा केला जातो.

सध्या शहरात 825 मेगावॉटची तूट जाणवते.

टाटा आणि रिलायन्स पॉवरमध्ये नेमका वाद असा आहे...

एप्रिलपर्यंत टाटा पॉवर कंपनी रिलान्सला 460 मेगावॉट वीज पुरवत होती.

मे महिन्यात सरकारने टाटा पॉवरला बेस्टला 100 तर रिलायन्सला 358 मेगावॉट वीज देण्याचे आदेश दिले.

कंपनीला आपल्या ग्राहकांना पुरवठा करण्यासाठी ही वीज हवी असल्याचे म्हणत, टाटा पॉवरने हे आदेश धुडकावून लावले.

ठराविक किंमतीत टाटा पॉवरकडून 358 मेगावॉट वीज मिळाली नाही तर आपल्याला इतर कंपन्यांकडून महाग दराने वीज घ्यावी लागेल आणि याची किंमत ग्राहकांना भरावी लागेल असे रिलायन्सचे म्हणणे आहे.

या वादावर तोडगा निघाला नाही किंवा इतर पर्यायांकडून वीज मिळाली नाही तर लोडशेडिंग करावे लागणार असल्याचे रिलायन्सचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2010 01:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close