S M L

किरेन रिजिजू यांच्यावर 450 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Sachin Salve | Updated On: Dec 14, 2016 04:37 PM IST

किरेन रिजिजू यांच्यावर 450 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

14 डिसेंबर : केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजूंवर घोटाळ्याचे आरोप झाल्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. अरुणाचलमधल्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी किरेन रिजिजूंवर हे आरोप झालेत. या जलविद्युतप्रकल्पांचं कंत्राट देताना किरेन रिजिजू यांनी तब्बल 450 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केलाय. काँग्रेसने रिजिजू यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

किरेन रिजिजू यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आणि जलविद्युत प्रकल्पाचं कंत्राट आपल्या चुलतभावाला मिळवून दिलं, असं काँग्रेसने म्हटलंय. पुरावा म्हणून या गैरव्यवहाराबद्दलची ऑडिओ क्लिप आपल्याकडे आहे, असा दावा काँग्रेसने केलाय. पण माझ्यावर असे आरोप करणा-यांना जोड्याने मारेन, अशा शब्दात किरेन रिजिजू यांनी या आरोपांना उत्तर दिलंय. पंतप्रधान कार्यालायाने याबद्दल माझ्याकडे कोणतंही स्पष्टीकरण मागितलेलं नाही, असंही ते म्हणाले.

किरेन रिजिजू यांचा भाऊ गोबोई रिजिजू यांना अरुणाचलमधल्या दोन जलविद्युत प्रकल्पांचं उपकंत्राट मिळालं होतं. यासंबंधी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिका-यांशी गोबोई यांनी केलेल्या संभाषणाचा पुरावा आपल्याकडे आहे, असं काँग्रेसने म्हटलंय. राज्य सरकारतर्फे बांधण्यात येणा-या जलविद्युत प्रकल्पांच्या बांधकामात हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 14, 2016 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close