S M L

रंगनाथ पठारेंना शिक्षा

14 मे सुनेचा छळ केल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना सांगलीच्या कोर्टाने शिक्षा ठोठावली आहे. साहित्यिक विश्वात यामुळे एकच खळबळ उडाली आहे.त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा यांनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव इथे प्रा.आनंदराव पाटील यांची मुलगी डॉ. रोहिणी हिच्याशी पठारे यांचा मुलगा अनिरुद्ध याचा 7 मे2007 रोजी विवाह झाला होता. त्यानंतर काही दिवसातच रंगनाथ पठारे, त्यांच्या पत्नी आणि पाठारेंचा मुलगा डॉ.अनिरुद्ध यांनी रोहिणीच्या पाठीमागे माहेरून 20 लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. हे पैसे त्यांना हॉस्पिटल बांधण्यासाठी हवे होते. माहेरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने आपल्याला एवढे पैसे आणणे जमणार नाही, असे रोहिणीने सांगितले. त्यानंतर पठारे, त्यांच्या पत्नी, आणि डॉ.अनिरुद्ध यांनी रोहिणीचा सातत्याने मानसिक छळ सुरू केला. एवढेच नाही तर रंगनाथ पठारे आणि त्यांचा मुलगा अनिरुद्ध याने रोहिणीच्या अंगावरचे लग्नातील दागिने काढून घेतले आणि रोहिणीला 26 मे 2008 ला तिच्या माहेरी सोडले. वारंवार विनंती करुनही रोहिणाला त्यांनी घरात घेतले नाही. शेवटी रोहिणीने डिसेंबर 2009मध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार सांगली कोर्टात दावा दाखल केला. यामध्ये न्यायाधीश जयश्री जगदाळे यांनी रोहिणीला 2 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. 31 जूनपर्यंत ही नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. तसेच लग्नाच्या वेळी रोहिणीच्या वडिलांनी घातलेले 126 ग्रॅम दागिने एक महिन्याच्या आत परत करावे आणि दरमहा 15 हजार रुपये पोटगी देण्याचाही कोर्टानेआदेश दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2010 10:49 AM IST

रंगनाथ पठारेंना शिक्षा

14 मे

सुनेचा छळ केल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना सांगलीच्या कोर्टाने शिक्षा ठोठावली आहे. साहित्यिक विश्वात यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा यांनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव इथे प्रा.आनंदराव पाटील यांची मुलगी डॉ. रोहिणी हिच्याशी पठारे यांचा मुलगा अनिरुद्ध याचा 7 मे2007 रोजी विवाह झाला होता. त्यानंतर काही दिवसातच रंगनाथ पठारे, त्यांच्या पत्नी आणि पाठारेंचा मुलगा डॉ.अनिरुद्ध यांनी रोहिणीच्या पाठीमागे माहेरून 20 लाख रुपये आणण्याचा तगादा लावला.

हे पैसे त्यांना हॉस्पिटल बांधण्यासाठी हवे होते. माहेरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने आपल्याला एवढे पैसे आणणे जमणार नाही, असे रोहिणीने सांगितले. त्यानंतर पठारे, त्यांच्या पत्नी, आणि डॉ.अनिरुद्ध यांनी रोहिणीचा सातत्याने मानसिक छळ सुरू केला. एवढेच नाही तर रंगनाथ पठारे आणि त्यांचा मुलगा अनिरुद्ध याने रोहिणीच्या अंगावरचे लग्नातील दागिने काढून घेतले आणि रोहिणीला 26 मे 2008 ला तिच्या माहेरी सोडले.

वारंवार विनंती करुनही रोहिणाला त्यांनी घरात घेतले नाही. शेवटी रोहिणीने डिसेंबर 2009मध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार सांगली कोर्टात दावा दाखल केला. यामध्ये न्यायाधीश जयश्री जगदाळे यांनी रोहिणीला 2 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

31 जूनपर्यंत ही नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. तसेच लग्नाच्या वेळी रोहिणीच्या वडिलांनी घातलेले 126 ग्रॅम दागिने एक महिन्याच्या आत परत करावे आणि दरमहा 15 हजार रुपये पोटगी देण्याचाही कोर्टानेआदेश दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2010 10:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close