S M L

भ्रष्टाचाराविरोधातील लढाईला विरोधकांचा विरोध - मोदी

Samruddha Bhambure | Updated On: Dec 16, 2016 06:34 PM IST

modi on dadari

16 डिसेंबर :   आज केवळ सत्ताधारी पक्षच काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात लढत आहे, असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं आणि विरोधक त्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही कधी घडलं नव्हतं, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्ला चढवला आहे.

भाजपाच्या संसदीय कार्यसमितीच्या बैठकीत मोदी बोलत होते. 8 नोव्हेंबरच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर विरोधकांनी घेतलेल्या भुमिकेचा या बैठकीत मोदी यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

याआधी सत्ताधारी पक्ष बोफोर्स आणि स्पेक्ट्रम सारख्या घोटाळ्यात बरबटलेला होता. त्यावेळीही विरोधी पक्षांनी भ्रष्टाचाराविरोधात एकजूट दाखवली होती. पण आज सत्ताधारी पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी काळ्या पैशाविरोधात लढत असताना त्याला विरोधक विरोध करत असल्याचं मोदी म्हणाले.

विशेष म्हणजे इंदिरा गांधींची सत्ता ही काळ्या पैशावर टिकलेली होती. तसे आरोप त्यांच्यावर होते, असा हल्ला मोदींनी उदाहरणासह केला. काळ्या पैशाविरोधात लढण्यासाठी नोटबंदी इंदिरांच्या काळातही गरजेची होती पण सत्ता गमावण्याच्या भीतीनं त्यांनी तो निर्णय टाळला पण शेवटी तो आपण घेतला हेही मोदींनी आवर्जून सांगितलं. या सगळ्या नोटबंदीचं यशवंतराव कनेक्शनही मोदींनी स्पष्ट करून सांगितलं.

भाजपाला पक्षापेक्षा देशहित सर्वात महत्वाचं आहे. काँग्रेसच्या काळात देशापेक्षा पक्षहित महत्वाचं होतं, असा चिमटाही त्यांनी काढला. कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांनी डिजिटल अर्थव्यवस्थेला जीवनाचा भाग बनवावे, असे आवाहनही त्यांनी केल्याचे अनंत कुमार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 16, 2016 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close