S M L

काळा पैशांबद्दल या मेल आयडीवर कळवा !

Sachin Salve | Updated On: Dec 16, 2016 07:32 PM IST

काळा पैशांबद्दल या मेल आयडीवर कळवा !

16 डिसेंबर : नोटबंदीनंतर देशभरात काळ्या पैशाला पाय फुटले आहे. जर तुम्हाला कुठे काळ्या पैशाचा संशय आला किंवा माहिती असेल तर blackmoneyinfo@incometax.gov.in या मेल आयडीवर काळ्या पैशाची माहिती नागरिकांनी सरकारला द्यावी असं आवाहन केंद्र सरकारनं आज केलं.

केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा ई मेलही जाहीर केला. blackmoneyinfo@incometax.gov.in या मेल वर नागरिकांनी काही संशय आल्यास माहिती कळवावी असंही ते म्हणाले. तसंच बँकेतल्या सर्व व्यवहारावर सरकारची करडी नजर आहे.

त्याचबरोबर त्यांनी काळा पैसा जाहीर करण्याची आणखी एक योजना जाहीर केली. उद्या पासून ते 31 मार्च 2017 पर्यंत नागरिक काळा पैसा जाहीर करू शकतात. त्या पैशावर 50 टक्के टॅक्स आणि दंड लावण्याचीही तरतूद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 16, 2016 07:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close