S M L

मुंबईतल्या रेल्वेसाठी 40 हजार कोटींच्या योजना

Sonali Deshpande | Updated On: Dec 18, 2016 06:20 PM IST

मुंबईतल्या रेल्वेसाठी 40 हजार कोटींच्या योजना

18 डिसेंबर - रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत मुंबईतील विविध रेल्वे सेवांचा शुभारंभ आज वांद्रे टर्मिनस येथे करण्यात आला. यांत प्रामुख्याने दिवा रेल्वे स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा देण्याची सुरुवात तसंच वांद्रे- गोरखपुर रेल्वे सेवेची सुरुवात यांचा समावेश आहे.

मुंबईककर असलेले सुरेश प्रभू खऱ्या अर्थानं मुंबईकरांना पावल्याचं म्हणावं लागेल. मुंबईतल्या रेल्वेसाठी 40 हजार कोटींच्या योजनांची सुरुवात होणार आहे. 24 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत या योजनांची सुरुवात होणार आहे.

या योजनेत रेल्वेची कामं यापुढे कॅशलेस पद्धतीनं करणार,बहुप्रतिक्षित आशिवारा राम मंदिर रेल्वे स्थानकाचं उद्घाटन येत्या काही दिवसात करणार आहेत.

तर मुंबई गोवा अंतर तीन तासात कापता येईल अशी तेजस एक्स्पेस सुरु करणार आहेत.

सुरेश प्रभूंच्या हस्ते आज दादर स्टेशनवरच्या फलाट क्रमांक 7चं उद्घाटन झालं. याबरोबर भाईंदर,वसई स्टेशनवरील एक्सलेटरचंही उद्घाटन प्रभूंनी केलं. मानखुर्द रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलाचं उद्घाटनही प्रभूंनी केलं.

आज मुंबईतल्या 9 स्टेशन्सवरच्या वायफाय सेवांचंही लोकार्पण केलं गेलं.याशिवाय पश्चिम रेल्वेच्या १२ डब्यांच्या १२ उपनगरीय सेवांचं १५ डब्यांमध्ये रुपांतर करण्याची घोषणाही प्रभूंनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2016 05:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close